पीक विम्यासाठी 31 जुलैचीच मुदत

The deadline for Akola Marathi News crop insurance is July 31
The deadline for Akola Marathi News crop insurance is July 31

अकोला : जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गंत खरीप हंगाम2020करिता पिकविमा काढण्याचे काम कॉमन सर्व्हिस सेंटर(सीएससी) व बॅंकेव्दारे सुरु असून आतापर्यंत जिल्ह्यात 1 लाख 60 हजार 688 शेतकऱ्यांनी पिक विमाचा लाभ घेतला आहे. शेतकऱ्यांनी ता. 31 जुलैपूर्वी सिएससी सेंटर किंवा बॅंक येथे भेट देवून पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.


कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकरी या योजनेला पात्र असून, बॅंकांना पिक विमा योजनेचे प्रकरणे स्विकारण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे. नैसर्गिक आपत्ती, किटकांचा प्रादुर्भाव किवा अचानक उद्भवलेल्या घटनेमुळे पिकांचे होणारे नुकसान यासाठी शेतकऱ्यांना विमाचे संरक्षण देणे आणि त्यांना आर्थिक पाठबळ देणे हा प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा उद्देश आहे. यासाठी शेतकरी आणि भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी यांच्यासह सर्व शेतकरी संरक्षणास पात्र आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आधार कार्डची प्रत, सातबारा, भाडेपट्टीने शेती करण्यारे यांचा करार, बॅंकेच्या पासबुकाची प्रत आणि प्रस्तावित पिकांची पेरणी करण्याचे स्व:तचे घोषणापत्र आदि कागदपत्राचा समावेश आहे.

अतिवृष्टीचा इशारा
हवामान विभाग, नागपूर यांच्या संदेशानुसार रविवार (ता.2 ऑगस्ट) पर्यंतच्या कालावधीत जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी,वारा, वादळ,विज पडणे इत्यादी नैसर्गिक आपत्ती होण्याची शक्‍यता वर्तविलेली आहे.


पुर्णा नदीवर असलेल्या घुंगशी बॅरेज प्रकल्पाचे पाण्याची पातळी 254.50 घ.मी. असून, सद्यस्थितीत सर्व गेट मधुन पाण्याचा विसर्ग पुर्णा नदीमध्ये होत आहे. पुर्णानदीची पाणी पातळी वाढण्याची शक्‍यता आहे. तसेच दगडपारवा प्रकल्पामध्ये 81.05 टक्के व काटेपुर्णा प्रकल्पामध्ये 75.81 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. तरी याबाबत आवश्‍यक ती दक्षता घेण्याचे अनुषंगाने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा व संबधित अधिकारी/कर्मचारी/मंडळ अधिकारी/तलाठी/ ग्रामसेवक कृषी सहायक,आरोग्य विभागाचे कर्मचारी यांना आपले मुख्यालयी उपस्थित रहावे. तसेच पूरबाधित क्षेत्रातील लोकांची योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com