
खरंय, कला आपलं जीवन समृध्द करते.मात्र, तुम्हाला कोणतीही लोककला येत असेल तर ही तुमच्यासाठी संधी आहे.
वाशीम : " एक तरी अंगी असू दे कला, नाहीतर काय फुका जन्मला " वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जीवनात कलेला खुप जास्त महत्व दिले आहे. माणूस जन्माला आला तेव्हापासुन कलेने जीवन जगावे हेच त्यांचे स्वप्न होते.
खरंय, कला आपलं जीवन समृध्द करते.मात्र, तुम्हाला कोणतीही लोककला येत असेल तर ही तुमच्यासाठी संधी आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती लोककला, पथनाट्याद्वारे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लोककला, पथनाट्य (गण-गवळण, अभंग, पोवाडे, वगनाट्य, बहुरूपी, भारुड इत्यादी) पथकांची निवडसूची तयार करण्यात येत आहे.
याकरिता जिल्ह्यातील अनुभवी संस्थांनी माहिती कार्यालयात अर्ज सादर करण्यासाठी २१ जानेवारी पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
हेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा
लोककला, पथनाट्य पथकाला विविध विषयांवर (शासकिय योजनांसह) कार्यक्रम, पथनाट्य करण्याचा अनुभव असावा. पथक किमान दहा जणांचे असावे.
यामध्ये स्त्री-पुरुष, वादक यांचा समावेश असावा. लोककला, पथनाट्य पथक ज्या जिल्ह्यातील असेल त्याच जिल्ह्यातून अर्ज दाखल करावा. केंद्र सरकाच्या गीत व नाट्य विभागाकडे नोंदणीकृत असल्यास प्राधान्य दिले जाईल. संस्थेकडे स्वतःची ध्वनिक्षेपण यंत्रणा असणे अपेक्षित आहे.
(संपादन - विवेक मेतकर)