दोनशे लोकवस्तीच्या गावाता दोघांचा मृत्यू, अनेकांना कोरोनाची लागण

दोनशे लोकवस्तीच्या गावाता दोघांचा मृत्यू, अनेकांना कोरोनाची लागण
Updated on: 

आगर (जि.अकोला) ः आगर गावापासून ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या व दहीहांडा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या गोत्रा या गावात कोरोनामुळे नुकतेच वयोवृद्ध नागरिक व युवकाचा मृत्यू झाल्याची घटना तारीख घडली. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Death of both at Gotra; Neglect of Dahihanda Primary Health Center)

कोरोना माहामारी संकट अधिक गडद होत असल्यामुळे ग्रामीण भागात या रोगाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. केवळ २०० लोकसंख्या असणाऱ्या पाळोदी गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या या गावाची लोकसंख्या अत्यल्प असल्यामुळे व नदी काठावर असलेल्या या गावाला कोणत्याच प्रकारची आरोग्य सुविधा मिळत नसल्यामुळे सदर गाव आदिवासी भागात असल्याचे बोलले जात आहे.

दोनशे लोकवस्तीच्या गावाता दोघांचा मृत्यू, अनेकांना कोरोनाची लागण
रस्त्यांवर तुफान गर्दी; यंत्रणा उदासिन, निर्बंध तुडवले पायदळी!

याच गावातून पंचायत समिती सदस्य अकोला तसेच जिल्हा परिषद सदस्य अकोला यांची ग्रामस्थांनी निवड केली आहे. दोन्ही सदस्य एकाच गावातील व एकाच प्रवर्गातील असून सुद्धा या गावाकडे आरोग्य विभाग हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. या गावाकडे पंचायत समितीचे सदस्य व जिल्हा परिषद सदस्य हे सुद्धा दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

दोनशे लोकवस्तीच्या गावाता दोघांचा मृत्यू, अनेकांना कोरोनाची लागण
सावधान; ‘हॅप्पी हायपोक्सिया’ ठरतोय सायलेंट किलर!

सदर गाव हे दहीहंडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असल्यामुळे दहीहांडा प्राथमिक आरोग्य केंद्र या गावापासून १५ ते २० किलोमीटर अंतरावर आहे. गावात दहीहांडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी फिरकत नसल्यामुळे या गावात आरोग्य समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. नदी काठावर असलेल्या गावात कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून आली आहे. आरोग्य विभाग नुसते या गावात छोटे-मोठे शिबिर घेऊन नागरिकांना तात्पुरता दिलासा देते. या गंभीर बाबीकडे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

तीन आठवड्यांपासून गावात रुग्णांची तपासणी

गोत्र हे गाव दहीहंडा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत शेवटचे गाव येत असून या गावात कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यासाठी आशा वर्कर तसेच आरोग्य सेवक व वैद्यकीय कर्मचारी यांच्यामार्फत या गावात दोन वेळा कॅम्प घेण्यात आला. या गावातील रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच त्यांना औषधी उपचार देण्यात येत असल्याची माहिती दहीहंडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी रेखा गवई यांनी दिली.

संपादन - विवेक मेतकर

Death of both at Gotra; Neglect of Dahihanda Primary Health Center

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

water issue in akola
Agriculture Loss by No Rain
Engineer Shriram Hazare Donates Award Money for Drought-Affected Farmers
Khamgaon APMC Extends Financial Aid of Rs 11 Lakhs for Drought-Affected Farmers
Marathi News Esakal
www.esakal.com