सावधान; ‘हॅप्पी हायपोक्सिया’ ठरतोय सायलेंट किलर! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावधान; ‘हॅप्पी हायपोक्सिया’ ठरतोय सायलेंट किलर!

सावधान; ‘हॅप्पी हायपोक्सिया’ ठरतोय सायलेंट किलर!

अकोला ः कोविडच्या (Covid19) अनुषंगाने वारंवार शरिरातील ऑक्सिजन (Oxygen) पातळी तपासणे आवश्यक आहे. ज्याला एसपीओ-२ पातळी असे म्हणतात. ही पातळी ९५ ते १०० पर्यंत सामान्य समजली जाते. ९५ ते ९० पर्यंत ही पातळी असल्यास तो व्यक्ती जोखमीचा ठरतो, त्यामुळे या अवस्थेपासून स्वतःचे बचाव करणे आवश्यक आहे. परंतु ही अवस्था ओळखून नागरिकांनी वेळेत उपचार न केल्यास त्याची जोखीम जीवावर बेतू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. 'Happy hypoxia' is becoming a silent killer!

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्‍याने वाढत आहे. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत सुद्धा सतत वाढ होत आहे. रुग्णालयांमध्ये रुग्ण अत्यवस्थ अवस्थेत पोहचत असल्याने त्यांना प्राणवायू (ऑक्सीजन), रेमडेसेविर इंजेक्शन द्यावे लागत आहेत, परंतु त्यांची उपलब्धता सुद्धा कमी आहे.

बहुतांश रुग्णांची स्थिती अतिशय वाईट असल्याने त्याचा ताण आरोग्य यंत्रणेवर पडत आहे. दरम्यान ही स्थिती टाळण्यासाठी नागरिकांनी घरच्या घरीच किंवा कोणत्याही खासगी, सरकारी डॉक्टरांकडे जावून पल्स ऑक्सिमिटरने स्वतःच्या शरीरातील ऑक्सिजनचा स्तर तपासून आपल्याला कोरोनाची लागण होऊ शकते अथवा नाही किंवा झाली असल्यास आपण लक्षण नसलेले रूग्ण आहोत का, याची तपासणी करुन कोरोनाच्या मोठ्या धोक्यापासून स्वतःचे व परिवाराचे रक्षण करता येऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.


हे आहेत लक्षण
ऑक्सिजन पातळी ९० पेक्षा कमी झाल्यास त्या व्यक्तीस तातडीने रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असते. साधारणतः दम लागणे, धाप लागणे हे ऑक्सिजन पातळी कमी झाल्याचे प्राथमिक लक्षण असते. मात्र धोका तेव्हा असतो जेव्हा रुग्णाला याबाबत जाणीवच होत नाही. या अवस्थेला ‘हॅप्पी हायपॉक्झिया’ असे म्हणतात. विशेष म्हणजे कोविड बाधितांमध्ये ही अवस्था जास्त आढळू शकते. त्यामुळे असे रुग्ण ओळखण्यासाठी त्या व्यक्तीने सतत ऑक्सिजन स्तर तपासणे आवश्यक आहे.

तरुणांमध्ये उशीराने दिसतात लक्षणे
तरुणांची रोगप्रतिकार शक्ती चांगली असते. त्यामुळे तरुण मुलं, मुली वृद्धांच्या तुलनेत कोणतीही लहान शारिरिक अस्वस्थता सहन करु शकतात. वृद्धांच्या शरिरातील ऑक्सिजन स्तर ९४ पासून ९० झाल्यास त्यांना त्रास होते. परंतु युवकांच्या शरीरातील ऑक्सिजनचा स्तर ९० पेक्षाही कमी झाल्यास त्यांना फारसा त्रास होत नाही. तरुण व रोगप्रतिकार शक्ती उत्तम असल्याने ते हायपोक्सियाला काही प्रमाणात सामोरे जावू शकतात. परंतु त्यांनी ही अवस्था वेळेत न ओळखल्यास त्यांना गंभीर परिणामांना सर्वांना समोरे जावे लागू शकते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

कोरोनापासून बचावासाठी शरिरातील ऑक्सिजनचा स्तर सतत तपासणे आवश्यक आहे. ऑक्सीजनचा स्तर ९४ पेक्षा कमी आल्यास लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वेळ पडल्यास जवळच्या रुग्णालयात किंवा ज्या ठिकाणी कृत्रिम ऑक्सिजनची व्यवस्था आहे. त्याठिकाणी भरती व्हावे.
- डॉ. सुरेश आसोले
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला

संपादन - विवेक मेतकर

'Happy hypoxia' is becoming a silent killer!

टॅग्स :Akola