कर्जबाजारी शेतकरी पुत्राची आत्महत्या | Akola | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकरी आत्महत्या

मूर्तिजापूर : कर्जबाजारी शेतकरी पुत्राची आत्महत्या

मूर्तिजापूर : तालुक्यातील ग्राम साखरी येथील युवा शेतकरी व शेतकरी पुत्र प्रवीण बाबूलाल पोळकट (वय ३२) याने १८ नोव्हेंबर रोजी विष प्राशन केले. दरम्यान उपचारासाठी त्यांना अकोला येथे पाठविण्यात आले मात्र, १९ नोव्हेंबरला उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा: व्याजाच्या पैशासाठी ट्रॅक्टर ओढून नेला, सावकाराला अटक

साखरी येथील रहिवासी प्रवीण पोळकट यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ क्लिप प्रसारीत केली असून, सदर क्लिपमध्ये माझ्याकडे जिल्हा बँकेचे व महिंद्रा कोटक बॅंकेचे कर्ज असल्याने मी आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. प्रवीण यांचे वडील कॅन्सरने आजारी असून, त्यांच्या नावे तीन एकर शेती आहे. हीच शेती गहान ठेवून महिंद्रा कोटक फायनान्स कंपनीकडून प्रवीण यांनी ट्रॅक्टर खरेदी केला होता, सतत होत असलेल्या नापिकीमुळे ट्रॅक्टरचे हप्ते थकले असल्याने कंपनीने १८ नोव्हेंबर रोजी ट्रॅक्टर ओढून नेला.

सदर ट्रॅक्टर कंपनीने ओढून नेल्याने प्रवीण यांना तो अपमान सहन झाला नाही. यामुळे महिंद्रा कोटक या फायनान्स कंपनीला दोषी ठरवत आपण आत्महत्या करीत असल्याचे व्हिडीओ क्लिपमध्ये म्हटले आहे.

loading image
go to top