esakal | करजगावच्या लोखंडीपुऱ्याने जपला अनोखा ठेवा
sakal

बोलून बातमी शोधा

करजगावच्या लोखंडीपुऱ्याने जपला अनोखा ठेवा

करजगावच्या लोखंडीपुऱ्याने जपला अनोखा ठेवा

sakal_logo
By
स्वप्नील वासनकर

करजगाव : येथील लोखंडीपुऱ्यातील श्री गजानन महाराज संस्थानने आपल्या गणेशोत्सवाची परंपरा 82 व्यावर्षीही अखंडितपणे सुरूच ठेवली आहे. कोरोनामुळे भक्तांचा हिरमोड झाला असून याठिकाणी साधेपणाने श्रींची स्थापना करण्यात आली आहे.

हेही वाचा: आयात शुल्कात कपात, खाद्य तेलाचे दर किती घटणार? जाणून घ्या

विशेष म्हणजे, या संस्थानमध्ये ज्या तीन मूर्ती आहेत त्या वेगळ्याच असून 15 सप्टेंबर 1939 ला स्थापन करण्यात आल्या आहेत. या तीन मूर्तींचे स्वरूप वेगळे आहे. येथील रायजी बाई खेरडे ही महिला आपल्या धाकट्या बहिणीकडे शिरजगाव कसबा येथे गेली असता त्यातील सटवाईपुऱ्यावरील मनमोहक गणेशमूर्ती बघून त्या भारावून गेल्या.

त्यांनी तिथे मूर्तिकाराला तशीच दुसरी मूर्ती बनवून देण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यावेळचे प्रसिद्ध मूर्तिकार गंगाराम चकाची वांगे (रा. शिरजगाव कसबा) व करजगाव येथील शिष्य बळीराम गोपाळ कविटकर या दोघा गुरू-शिष्यांनी मिळून प्रथम गणेशमूर्ती नंतर हनुमंत व त्यानंतर गुरुड देवाची मूर्ती तयार करून निःशुल्क स्वरूपात या तीन मूर्ती संस्थेला दान दिल्या. या मूर्तीचे विशेष म्हणजे या तीन मूर्ती बनवताना चिंचोके, कागदी रद्दी, सुती पोते तसेच लोखंडी सळाखी इत्यादी टाकाऊ वस्तूंपासून तयार करण्यात आल्या.

लोखंडीपुऱ्यातील गणेश उत्सवाची मिरवणूक काही वेगळीच असते. देखना रथ, ढोलताशांचे स्वतंत्र मंडळ, सुंदर देखावा त्यात संगीताच्या तालावर बेधुंद होऊन असणारे गणेशभक्त सर्वांचे लक्ष वेधून घेतात. दरवर्षी काहीतरी वेगळे व नवीन करण्याचा या मंडळाचा स्वभाव असल्याने गावकऱ्यांबरोबरच पंचक्रोशीतील नागरिकांना गणेश उत्सवाची उत्सुकता लागलेली असते.

हेही वाचा: अच्छे दिन! खाद्य तेल फक्त सहा रुपयांनी स्वस्त

परंतु यावर्षी कोरोनामुळे अत्यंत साधेपणाने याठिकाणी गणेशोत्सव पार पडत आहे. करजगाव म्हटले की गणपती, असे समीकरण गेल्या कित्येक वर्षांपासून बघायला मिळते. परंतु यावर्षी याठिकाणी सर्वत्र शुकशुकाट बघायला मिळत आहे. मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बाप्पाचा 83 वा वाढदिवस 15 सप्टेंबरला साजरा होणार आहे.

गावातून काढली जाते मिरवणूक

या तिन्ही मूर्तींची स्थापना झाल्यानंतर शेवटच्या दिवशी या तिन्ही मूर्तींना रथामध्ये स्थापन करून संपूर्ण गावातून मिरवणूक काढली जाते. त्यानंतर त्या तीनही मूर्ती संस्थांमध्ये ठेवल्या जातात. सोबतच एका वेगळ्या गणेशाचीसुद्धा स्थापना केली जाते. स्थापन केलेल्या गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते.

loading image
go to top