esakal | आत्मविश्वासाच्या बळावर कर्करोगाला हरवलं
sakal

बोलून बातमी शोधा

आत्मविश्वासाच्या बळावर कर्करोगाला हरवलं

आत्मविश्वासाच्या बळावर कर्करोगाला हरवलं

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कर्करोगासारख्या जीवघेण्या रोगावर आत्मविश्वासाच्या बळावर मत करणारा लढवया वन्यजीव सेवक बाळ काळणे रोगमुक्त झाले आहेत. दोन वर्षांच्या संघर्षातून त्यांनी जीवघेण्या कर्करोगाला हरवले आहे.

वन्यजीव सेवक म्हणून आयुष्यभर सेवा देणारे बाळ काळणे यांना दोन वर्षांपूर्वी कर्करोगाने ग्रासल्याचे निदान झाले. मात्र, त्यांनी धीर न सोडता या जीवघेण्या रोगाविरुद्ध संघर्ष सुरू केला. समाजातील त्यांच्या हितचिंतकांनी या लढ्यात त्यांना तन-मन-धनाने बळ दिले आणि आज दोन वर्षानंतर ते रोगातून पूर्णपणे बरे झाले आहे.

याबाबत बाळ काळणे यांनी स्वानुभव व्यक्त करताना सांगितले की, कँसरवर मात करण्यामागे माझी सर्पसेवा व वन्यजीव सेवा ही मला महाऔषध ठरली. या सेवेमुळे घाबरण्यावर मी मात करू शकलो. आत्मविश्वास वाढला व संघर्ष करण्याची जिद्द मिळाली. हेच प्रमुख कारण कर्करोगातून मुक्त होण्यामागे आहे.

कँसरचे बेड वरील उपचार चालू होते. पाच महिने माझी सेवा बंद होती. बेडवरून उतरल्याबरोबर तत्काळ सेवा सूरू केली. जी सेवा २२ वर्षांपासून सुरू होती ती कर्करोगाचे निदान झाल्यानंतरही अविरत सुरूच ठेवली. सर्पसेवा व वन्यजीव सेवा या आत्मविश्वासाने येणारे अनेक वर्ष ही करत राहणार.

कँसर काळात संत तुकाराम हॉस्पिटलने चांगले उपचार केले. फार काळजी घेतली. मित्रमंडळी, राजकीय नेते, शासकीय अधिकारी, अकोला वनकर्मचारी, नातेवाईक सर्पमित्र यांची संकट काळात मोलाची साथ मिळाल्याचे बाळ काळणे यांनी सांगितले. त्यांनी कोरोना काळात रुग्णांना धीर द्या, त्यांचा आत्मविश्वास वाढवा, हेच त्यांच्यासाठी मोठे औषध असल्याचा संदेशही दिला.

संपादन - विवेक मेतकर

loading image