

Aspirants Restless as ZP Election Schedule Remains Undecided
Sakal
अकोला : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखा कधी जाहीर होणार याची उत्सुकता इच्छुकांना लागली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत निवडणुका घ्याव्या, असा आदेश दिला असला तरी सध्याच्या परिस्थितीमध्ये या निवडणुका पुढे ढकलल्या जाणार असल्याचं जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे अकोला जिल्हा परिषदेसह त्याअंतर्गत येणाऱ्या सात पंचायत समित्यांची निवडणूक लांबणीवर पडली आहे. परिणामी इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.