कृषी उत्पन्न बाजार समित्यांना सहकार विभागाच्या कानपिचक्या

मनोज भिवगडे  
Thursday, 25 June 2020

कृषी उत्पन्न बाजार समित्या शेतकरी हितासाठी स्थापन करण्यात आल्या आहेत. मात्र समित्या शेतकऱ्यांसाठी कामच करीत नसल्याचे दिसून येते. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक झळ सहन करावी लागत असल्याच्या कानपिचक्या जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांना जिल्ह उपनिबंधक डॉ.प्रवीण लोखंडे यांनी दिल्या आहेत.

अकोला : कृषी उत्पन्न बाजार समित्या शेतकरी हितासाठी स्थापन करण्यात आल्या आहेत. मात्र समित्या शेतकऱ्यांसाठी कामच करीत नसल्याचे दिसून येते. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक झळ सहन करावी लागत असल्याच्या कानपिचक्या जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांना जिल्ह उपनिबंधक डॉ.प्रवीण लोखंडे यांनी दिल्या आहेत. 

 

अकोला जिल्ह्यातील अकोला, अकोट व मूर्तिजापूर या तीन बाजार समितीच्या सभापती व सचिवांना जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी ड्रायर व सेपरटर न बसविल्याने शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आर्थिक नुकसानिवरून 22 जून 2020 रोजी खरमरीत पत्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व सचिवांना दिले आहे. या पत्रात त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितींच्या पदाधिकारी व सचिवांची कानउघाडनी करताना शेतकऱ्यांचे हित जोपासले जात नसल्याने होणाऱ्या आर्थिक नुकसानीकडे लक्ष वेधले आहे. 

 

प्रति क्विंटल दोन हजारचे नुकसान
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी त्यांचा शेत माल विक्रीसाठी घेवून येतो. दरवर्षी मूग, उडीद, तूर, हरभरा आदी शेतमाल विक्रीसाठी आणतो. शेतमालात पावसामुळे आद्रतेचे प्रमाण मर्यादेच्या बाहेर असल्याचे दिसून येते. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल दरामध्ये सुमारे आठ हजारापर्यंत तोटा सहन करावा लागतो. कृषी उत्पन्न बाजार समिती मुळातच शेतमालाला रास्त भाव मिळवून देण्यासाठी असताना हेच काम त्यांच्याकडून होताना दिसत नसल्याचे यावरून स्पष्ट होते.  

आठ महिन्यांपासून कार्यवाही नाही
जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) या विभागाने 10 ऑक्टोबर 2019 रोजी सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांना पत्र पाठवून ड्रायर व सेपरेटर बसविण्याबाबत सूचित केले होते. त्या पत्रावर अद्यापर्यंत कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. यावरून कृषी उत्पन्न बाजार समित्या शेतकऱ्यांच्या हितासाठी किती काम करते हे स्पष्ट होते. 

समिती गठीत करण्याचे निर्देश
कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करते. त्यामुळे बाजार समितीने शेतकरी हिताकडे लक्ष देवून बाजार समितीच्या निधीतून (वाढवा) खर्च करीत बाजार समितीमध्ये तातडीने ड्रायर व सेपरेटर बसविण्याची कार्यवाही करावी. त्यासाठीतीन सदस्यीय समिती स्थापन करावी व समितीमध्येजिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील प्रतिनिधी म्हणून एका अधिकारी, कर्मचाऱ्याचा समावेश करावा. त्याबाबतच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला सादर करावा, असा आदेश जिल्हा उपनिबंधक डॉ.प्रवीण लोखंडे यांनी जिल्ह्यातील अकोला, अकोट व मूर्तिजापूर बाजार समितीच्या सभापती व सचिवांना दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Department of Co-operation angry in Agricultural Produce Market Committees function