ajit pawar
sakal
अकोला - शेतकरी अडचणीत आला तर महाराष्ट्र अडचणीत येईल. याची जाणीव आम्हा राज्यकर्त्यांना आहे. त्यामुळे या वर्षी शेतकऱ्यांना ३३ हजार कोटींचे पहिले मदत पॅकेज दिले. दिवाळीनंतर पुन्हा नुकसान झाल्यानंतर ११ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. दोन्ही मिळून ४४ हजार कोटींची मदत दिल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.