

Half-Burnt Body of Young Woman Found in Dhanegaon Farmlands
Sakal
बाळापूर : धनेगाव शेतशिवारात अर्धवट जळालेल्या अवस्थेत अनोळखी युवतीचा नग्न मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिस, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक, ठसेततज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले आहेत. तुरीच्या शेतात गुरुवारी दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. बाळापूर पोलिस स्टेशन हद्दीतील धनेगाव शेतशिवारात अर्धवट जळालेल्या अवस्थेत एका युवतीचा नग्न मृतदेह आढळून आला. त्यामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.