esakal | अकोल्यातील पाच पोलिसांना महासंचालकांचे बोधचिन्ह

बोलून बातमी शोधा

अकोल्यातील पाच पोलिसांना महासंचालकांचे बोधचिन्ह
अकोल्यातील पाच पोलिसांना महासंचालकांचे बोधचिन्ह
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः पोलिस दलात काम करताना १५ वर्षे उत्तम सेवाभिलेख असल्याबद्दल अकोला जिल्ह्यात कार्यकरत पाच पोलिस अधिकारी व कर्मचारांना पोलिस महासंचालकांचे बोधचिन्ह व सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. यात पोलिस उपनिरीक्षक विजय रामराव पाटील, सहायक पोलिस उपनिरीक्षक सुनील बबनराव पाताडे, राजेंद्र विश्ननाथ बोधडे, पोलिस नाईक अश्विनकुमार हरिप्रसाद मिश्रा आणि पोलिस हवालदार देमा कोंडुजी वंजारे यांचा समावेश आहे.

पातुर शहरात पोलिसांनी वाटले मोफत मास्क

पातुर ः पातुर पोलिस स्टेशनच्या वतीने ठाणेदार हरीश गवळी यांच्या मार्गदर्शना खाली एएसआय हरीदास अवचार, पोलिस कर्मचारी अनुप आसटकर, गेडाम, वर्मा, होमगार्ड तालुका समादेशक संगीता इंगळे, पिंगळे यांच्या हस्ते मास्क वाटप करण्यात आले. मास्क विना फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी दंडात्मक कार्यावाही केली. परंतु काही नागरिक जानून बुजून मास्क न लावता फिरत होते. त्यांना कोरोणा बाधा होऊ नये व नियमाची अमलबजावणी व्हावी याकरिता आज शहरातील जुने बस स्थानक, संभाजी चौक, चेक पोस्ट व मुख्य बाजार पेठेत मास्कचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी पोलिस व होमगार्ड शुभम काळपांडे, नीलेश नाकट, दत्ता भोरे, मयुर राऊत यांचे सहकार्य लाभले.