esakal | यंदा पाच प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग; पावसाचे प्रमाण अधिक
sakal

बोलून बातमी शोधा

पाण्याचा विसर्ग

खामगाव : यंदा पाच प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग; पावसाचे प्रमाण अधिक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खामगाव (जि. बुलडाणा) : पाटबंधारे उपविभाग खामगाव अंतर्गत जळगाव जामोद व खामगाव तालुक्यात दोन मध्यम व नऊ लघु प्रकल्पांचा समावेश आहे. यापैकी गतवर्षी २०२० च्या पावसाळ्यात सात प्रकल्प शंभर टक्के पाण्याने भरले होते. तर यंदाच्या पावसाळ्यात ९ ऑक्टोबरपर्यंत केवळ पाच प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा, राजूरा व गोडाडा या प्रकल्प क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत यंदा २० मी.मी.पाऊस अधिक पडला आहे.

यावेळी हवामान खात्याने चांगला पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता. हा अंदाज खरा ठरला आहे. जून ते ऑगस्ट या तीन महिन्याच्या कालावधीत तालुक्यात धोधो पाऊस बरसला नसल्याने या प्रकल्पात पाहिजे त्या प्रमाणात जलसाठा संचित झाला नव्हता पण सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात या प्रकल्प क्षेत्रात चांगला पाऊस बरसल्याने जळगाव जामोद तालुक्यातील राजूरा, गोडाडा, खामगाव तालुक्यातील ज्ञानगंगा, टाकळी व ढोरपगाव हे प्रकल्प सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यातच शंभर टक्के भरले होते.

हेही वाचा: RSS मध्ये महिलांचाही समावेश?; भागवतांच्या दसरा भाषणाकडे लक्ष

या प्रकल्पातून आजही सांडव्या वरुन पाण्याचा विसर्ग सुरु आहे. हे प्रकल्प पाण्याने तुडूंब भरुन वाहत असल्याने या प्रकल्पातून ज्या ज्या गावांना पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. त्या गावातील लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागणार नाही. शेतकऱ्यांना या प्रकल्पातून रब्बी हंगामातील पिके घेण्यासाठी पाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यांना दुसरे उत्पादन घेता येणार आहे. गतवर्षी या प्रकल्प क्षेत्रात येणाऱ्या शेकडो गावातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी पाणी देण्यात आले होते. या माध्यमातून शेतकऱ्यांनी रब्बी पिकांबरोबरच भाजीपाल्यांचे उत्पादन घेतले होते.

ज्ञानगंगा, मस, राजूरा, गारडगाव, टाकळी, पिप्रीगवळी व ढोरपगाव हे सात प्रकल्प गतवर्षीच्या पावसाळ्यात सप्टेंबर महिन्यातील वेगवेगळ्या तारखांना शंभर टक्के भरले होते. तर ९ ऑक्टोबर पर्यंत धानोरा प्रकल्पात ९०.६७ टक्के, गोडाडा ९८.७१ टक्के, बोरजवळा ६२.३७ टक्के, लांजुड २१.१७ टक्के जलसाठा होता. ज्ञानगंगा प्रकल्प क्षेत्रात ७०१ मी.मी., मस प्रकल्प क्षेत्रात ७३६ मी.मी., धानोरा प्रकल्प क्षेत्रात ९०.६७ मी.मी., राजूरा प्रकल्प क्षेत्रात ७५० मी.मी.गोडाडा प्रकल्प क्षेत्रात ७५० मी.मी., लांजुळ प्रकल्प क्षेत्रात ६७० मी.मी.पाऊस पडल्याची माहिती आहे.

प्रकल्पाचे नाव जलसाठा दलघमी टक्केवारी पाऊस

 • ज्ञानगंगा - ३३.९३ १०० ६२४

 • मस - १३.६८ ९०.९६ ६२५

 • धानोरा - ०.६४० ७१.७४ ७७०

 • राजूरा - ३.३९४ १०० ७७०

 • गोडाडा - १.७७१ १०० ७७०

 • बोरजवळा - ०.९२५ १०० -

 • गारडगाव - ०.२३८ १०.४५ -

 • टाकळी - १.१३६ १०० -

 • लांजूळ - १.२६ ७२.७५ ७२८

 • प्रंप्रीगवळ - १.९९ ७०.५३ -

 • ढोरपगाव - ५.८४ १०० -

loading image
go to top