esakal | रा. स्व. संघात आता महिलांचाही समावेश?; भागवतांच्या दसरा भाषणाकडे लक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

RSS

RSS मध्ये महिलांचाही समावेश?; भागवतांच्या दसरा भाषणाकडे लक्ष

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये (ईएए) आता महिलांचा समावेश होण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. याला कारणही तसेच आहे. संघप्रमुख मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी याबाबतचे संकेत दिले होते. त्यामुळे आता येत्या दसरा मेळाव्यात ते याबाबत महत्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

हेही वाचा: कोळसा संकट ही अफवा, भारत पॉवर सरप्लस देश; सीतारामण यांचा दावा

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमाला संबोधित करताना मोहन भागवत यांनी म्हटलं होतं, "संघाचा उद्देश हिंदू समाजाला एकजूट करणं आहे. पण आम्ही जेव्हा कार्यक्रम आयोजित करतो तेव्हा तिथे केवळ पुरषचं दिसतात. जर आपल्याला संपूर्ण समाज एकजूट करायचा असेल तर या कार्यक्रमात कमीत कमी ५० टक्के महिलांना समावून घ्यावं लागेल. भागवतांच्या या विधानावर काही राजकीय विश्लेषकांनी विश्लेषण करताना म्हटलं की, रा. स्व. संघ आपल्या संघटनेत महिलांच्या प्रवेशाची तयारी करत आहे? अमर उजालानं याबाबत वृत्त दिलं आहे.

हेही वाचा: भावाच्या काळजीनं शाहरुखची लेक पडली आजारी

संघामध्ये महिलांची भूमिका आणि त्यांच्या वाट्यावरुन कायमच सवाल उपस्थित होत राहिले आहेत. संघात महिलांसोबत काम करण्याबाबत किंवा त्यांच्या प्रवेशाबाबत सुरुवातीपासूनच उत्सुक नाही. संघाच्या दुसऱ्या संघटना जसं विद्यार्थी परिषद, भाजप आणि इतर संघटनांमध्ये केवळ महिलांचा सहभागच नव्हे तर ते उच्च पदावर कार्यरत आहेत. परंतू संघाच्या मूळ संघटनेत अद्याप महिलांचा समावेश झालेला नाही.

संघ बदलांचा स्विकार करणारी संघटना

संघाला ओळखणाऱ्यांचं म्हणणं आहे की, संघानं समाजातील बदलांना चांगल्या प्रकारे ओळखलं आहे. त्यामुळे काळासोबत चालण्याचा ते कायम प्रयत्न करत असतात. इतकचं नव्हे तर समाज आणि कौटुंबिक पातळीवर जे बदल होत आहेत त्यालाही संघ स्विकारत आहे. परंतू शंभर वर्षे पूर्ण करणारा संघात महिलांच्या समावेशाबाबत अद्यापही चर्चा सुरुच असतात.

महिलांचा प्रवेश अवघड

काही वरिष्ठ पत्रकारांच्या मते, संघातमध्ये महिलांचा सहभाग होण्याची चिन्हे खूपच कमी आहेत. कारण त्यांचं म्हणणं आहे की, हा पुरुषांचा पूर्णवेळ संघटन असून महिलांसाठी वेगळी संघटना आहे. त्यामुळे यामध्ये गोंधळ निर्माण करणं चुकीचं आहे.

राहुल गांधींनी कायम उपस्थित केले सवाल

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी रा. स्व. संघात महिलांचा समावेश नसल्याने संघाला कायमच निशाणा बनवलं आहे. त्यांचा आरोप आहे की, संघ महिलांसोबत भेदभाव करतो. त्यामुळेच महिला संघात समावेश नसतात किंवा त्यांच्या शाखांमध्येही दिसत नाहीत.

loading image
go to top