esakal | बालकांच्या जिवाशी खेळ; अंगणवाडी केंद्रांतून निकृष्ट आहाराचे वाटप
sakal

बोलून बातमी शोधा

अंगणवाडी केंद्र

बालकांच्या जिवाशी खेळ; अंगणवाडी केंद्रांतून निकृष्ट आहाराचे वाटप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

प्रा. अविनाश बेलाडकर
मूर्तिजापूर : अंगणवाडी केंद्रांमधून चक्क कालबाह्य झालेला (एक्स्पायरी डेट संपलेला) व निकृष्ट दर्जाचा आहार लाभार्थ्यांना पुरविला जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे याप्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे. (Distribution of substandard food from Anganwadi Centers)

शासन अंगणवाडी केंद्रांमार्फत महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून गर्भवती महिला, स्तनदा माता व सहा वर्षे वयापर्यंताच्या बालकांना आहार उपलब्ध करून देते. या तालुक्यात १९१ अंगणवाड्या आहेत. प्रत्येक अंगणवाडीत १ सेविका व एक मदतनीस कार्यरत असणे अपेक्षित आहे, परंतु या तालुक्यातील १५ सेविका व २६ मदतनिसांच्या जागा रिक्त आहेत. या बाबीचा विपरीत परीणाम अंगणवाड्यांच्या कामकाजावर होतोच, परंतु शासनाकडून पुरविल्या जाणाऱ्या आहाराचा दर्जा निकृष्ट असल्यामुळे व काही पाकीटे कालबाह्य असल्यामुळे लाभार्थ्यांच्या जीविताचा धोका निर्माण झाला आहे. या तालुक्यातील सोनोरी अंगणवाडी क्रमांक ३ वरील लाभार्थी महिलेचे पती प्रमोद पाथरे यांनी कालबाह्य धान्य मिळत असल्याची तसेच हरभरे भूंगा आणि झुरळं लागलाले, तर मिरची पूड कालबाह्य झालेली मिळत असल्याची तक्रार केली आहे.

हेही वाचा: खोटे कागदपत्रे तयार करुन जमिन हडपली!


असा करण्यात येतो आहाराचा पुरवठा
या तालुक्यात गेल्या महिन्यांच्या आकडेवारीनुसार ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील ४ हजार ५२२, ३ ते ६ वर्षे वयोगटातील ५ हजार ४९३ बालके तसेच १ हजार गरोदर व ८०७ स्तनदा माता आहेत. १-१ महिन्यांच्या आहाराची मागणी जिल्हा परिषदेच्या बालकल्याण विभागाकडे नोंदविली जाते. सर्व अंगणवाडी सेविकांकडून प्राप्त आकडेवारीनुसार मागणी नोंदविल्यानंतर शासन नियुक्त समिती आहाराचा पुरवठा करते.

हेही वाचा: अदलाबदली; जिल्हाधिकारी मनपा आयुक्तपदी तर मनपा आयुक्त जिल्हाधिकारीविषबाधा होण्याची शक्यता
पंचायत समितीच्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात अंगणवाड्यांचे कामकाज अंगणवाडी सेविका मदतनिसांच्या मदतीने पार पाडतात. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेत कालबाह्य आहार पुरविला जात असेल, तर त्यासाठी जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कालबाह्य आहार सेवन केल्याने अन्नविषबाधा होण्याची, गर्भवती महिलांच्या गर्भावर अनिष्ट परिणाम होण्याची, स्तनदा माता बालकांसह आजारी पडण्याची शक्यता विचारात घेता हा गंभीर प्रकार दूर व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

आहार पौष्टिक असावा. कालबाह्य आणि निकृष्ट दर्जाचा नसावा. सोनोरीच्या अंगणवाडी क्रमांक ३ मधून मिळणारा आहार कालबाह्य आहे. हरभरा भुंगा लागलेला आणि झुरळं झालेला झालेला, तर मिरची पुड असणारे पाकीट एक्सायरी डेट संपलेले आहे.
- प्रमोद पाथरे, लाभार्थी महिलेचे पती

जेवढ्या लाभार्थ्यांचा आहार येतो, तेवढा आणि तसा आम्ही वितरीत करतो.
- कल्पना तांबडे, अंगणवाडी सेविका

आम्ही मागणी जि.प. बालकल्याण विभागाकडे नोंदवितो. त्यानुसार शासनाकडून थेट पुरवठा होतो. दर्जाबाबत सेविकांनी कळवायला हवे.
- विस्तार अधिकारी (सांख्यिकी), पं.स. मूर्तिजापूर

संपादन - विवेक मेतकर
Distribution of substandard food from Anganwadi Centers

loading image