esakal | खोटे कागदपत्रे तयार करुन जमिन हडपली!
sakal

बोलून बातमी शोधा

खोटे कागदपत्रे तयार करुन जमिन हडपली!

खोटे कागदपत्रे तयार करुन जमिन हडपली!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः शहरातील जुने शहर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजे डाबकी शेत शिवारात ७.९५ आर जमिनीचे खोटी कागदपत्रे सादर करून जमिनीत फेरफार करण्यात आले. तसेच जमिनीची परस्पर विक्री केल्याने फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरुन दोन आरोपी, तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांसह चौघांविरोधात जुने शहर पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Land was grabbed by making false documents!)

हेही वाचा: भाषण सुरु असतानाच अमोल मिटकरींना अर्धांगवायूचा सौम्य झटका, प्रकृती स्थिर

फिर्यादी राजेश्वर गुणवंतराव पारस्कर (वय ४२, रा. आदर्श कॉलनी, ह.मु. घोडबंदर रोड, ठाणे वेस्ट मुंबई) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची मौजे डाबकी शेतशिवारात शेतजमीन आहे. या जमिनीमध्ये आरोपी ज्ञानेश्वर गुणवंतराव पारस्कर (रा. अकोला), सरोज ज्ञानेश्वर पारस्कर, मंडळ अधिकारी थिटे, तलाठी शितल अटल यांनी संगनमत करून ७.९५ आर जमिनीचे खोटे कागदपत्रे बनवून जमिनीच्या कागदपत्रांमध्ये फेरफार केली. तसेच ७.९५ आर जमीन स्वताच्या नावावर करून घेत खोटी माहिती सादर करून जमीन परस्पर विक्री करण्याचा प्रयत्न केला. याची माहिती फिर्यादी राजेश्वर गुणवंतराव पारस्कर यांना मिळाल्याने फिर्यादीने थेट जुने शहर पोलिस स्टेशन गाठून फिर्याद दिली.

हेही वाचा: सुनेला रॉकेल टाकून जाळणाऱ्या आतेसासुला जन्मठेप

या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्वर गुणवंतराव पारस्कर (रा. अकोला), सरोज ज्ञानेश्वर पारस्कर, मंडळ अधिकारी थिटे, तलाठी शितल अटल यांच्याविरोधात भादवि कलम ४६३, ४६७, ४७१, ४२०, ३४ नुसार गुन्हे दाखल केले. याप्रकरणी जुने शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय लवंगळे अधिक तपास करीत आहेत.

Land was grabbed by making false documents!

loading image