Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

यंदाच्या खरीप हंगामात महाबीजच्या काही बियाण्यांच्या उगवणीबाबत शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या.
Mahabeej Seeds Complaint

Mahabeej Seeds Complaint

sakal

Updated on

अकोला - महाबीजच्या बियाण्यांमुळे नुकसान झाल्याच्या जिल्ह्यातील २५५ तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कृषी विभागाने त्यांची चौकशी केली. यातील १३४ तक्रारी तथ्यपूर्ण आढळून आल्या. मात्र, एवढ्या मोठ्या संख्येने तक्रारी प्राप्त होऊनही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई अथवा पुढील कार्यवाहीबाबत ठोस माहिती मिळत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणाची माहिती देण्यास जिल्हा प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप होत असून, महाबीज प्रशासनानेही माहिती देण्यास नकार दिल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेत आहे, असा सवाल उपस्थित झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com