Akola News | एक महिन्याच्या आत तेल्हारा ते आडसूळ रस्ता चालण्या योग्य करू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

akola District Collector Neema Arora

अकाेला : एक महिन्याच्या आत तेल्हारा ते आडसूळ रस्ता चालण्या योग्य करू

तेल्हारा : तालुक्यातील दयनीय अवस्था झालेल्या रस्त्यांबाबत जिल्हाधिकारी यांच्या दालनात जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली २५ जानेवारी रोजी झालेल्या आढावा बैठकीत जागतिक बँक प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी एक महिन्याच्या आत तेल्हारा तालुक्यातील आडसूळ ते तेल्हारा रस्ता चालण्या योग्य करू अशी ग्वाही दिली.

तेल्हारा तालुक्यातील चारही भागातील रस्त्यांची अक्षरशः वाट लागली असून, रस्ते खोदून ठेवल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या बाबतीत तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांची कामे विनाविलंब सुरू व्हावे याकरिता तेल्हारा येथील विशाल नांदोकार यांनी काही दिवसांपूर्वी बेमुदत उपोषण केले होते. याची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या दालनात दुसऱ्यांदा बैठकीचे आयोजन केले होते.

हेही वाचा: दहावी-बारावीसाठी शाळा तिथे परीक्षा केंद्र! एका वर्गात 25 विद्यार्थी

आपण कुठल्याही प्रकारचे कारण न देता सदर रस्त्याचे कामे तातडीने सुरू ठेवून निर्धारित वेळेत काम पूर्ण करून, कामे अखंडितपणे सुरू राहावे. अशा, शब्दात आढावा बैठकीत जिल्‍हाधिकाऱ्यांनी उपस्थित अधिकारी व कंत्रादारांना निर्देश दिले.

यावेळी संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांनी तेल्हारा ते आडसूळ रस्ता एक महिन्याच्या आत चालण्या योग्य करू अशी ग्वाही दिली. तसेच, सर्व कामें निरंतर चालू राहावे याकरिता जिल्हाधिकारी यांनी २५ फेब्रुवारी रोजी पुन्हा बैठक घेण्याचे ठरविले आहे. यावेळी कार्यकारी अभियंता पी.आर. सरनाईक, निवासी अभियंता, शाखा अभियंता, संबंधित कंत्राटदार, रस्ता देखरेख समितीचे उज्वल दबळघाव, सतीश उंबरकर, विशाल नांदोकार, रामभाऊ फाटकर, आनंद राठी, गजानन गायकवाड, ॲड. जयश्री मानखैर, अनंत मानखैर उपस्थित होते.

Web Title: District Collector Neema Arora Discussing With Officials Review Meeting Road From Telhara

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top