
कारंजा : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीतच विविध पक्षाकडून जिल्हा परिषद निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांनी फिल्डींग लावली असली तरी विधानसभा निवडणुकीत तालुक्यातील आठही जिल्हा परिषद सर्कलमधून महायुतीतील भाजपाच्या उमेदवार सई प्रकाशदादा डहाके यांना लीड मिळाल्याने महायुतीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे हौसले बुलंद दिसत आहे.