Akola News : उद्योजकांसमोर पोलिस ठाण्याच्या हद्दीचा प्रश्न; सुरक्षेचा प्रश्न गंभीर, एमआयडीसी परिसराची तीन हद्दीत विभागणी

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एमआयडीसी परिसरासाठी स्वतंत्र पोलिस ठाणे सुरू करण्यात आले.
division of MIDC area into three boundaries entrepreneurs serious security issue
division of MIDC area into three boundaries entrepreneurs serious security issueSakal

Akola News : एमआयडीसीचा परिसर खदान, बार्शीटाकळी व एमआयडीसी अशा तीन पोलिस ठाण्यांच्या हद्दीत विभागला गेला आहे. ‘एमआयडीसी’साठी सुरू झालेल्या स्वतंत्र पोलिस ठाण्याअंतर्गत हा सर्व परिसर समाविष्ट करावा, ही मागणी उद्योजक सातत्याने करत आहेत. मात्र, याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे.

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एमआयडीसी परिसरासाठी स्वतंत्र पोलिस ठाणे सुरू करण्यात आले. मात्र, या पोलिस ठाण्याचा मूळ उद्देशच बाजूला राहिला आहे. त्याला कारण म्हणजे खदान बार्शीटाकळी व एमआयडीसी अशा तीन पोलिस ठाण्याच्या अंतर्गत एमआयडीसीची हद्द आहे.

एखादी अनुचित घटना घडल्यास पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहचावेत, यासाठी एमआयडीसी पोलिस ठाण्याची उभारणी झाली होती. मात्र एमआयडीसीची हद्द तीन पोलिस ठाण्यांच्या अंतर्गत विभागण्यात आल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.

एमआयडीसीचा संपूर्ण परिसर हा नवीन झालेल्या एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत समाविष्ट करण्याची मागणी अकोला इंडस्ट्रीज असोसिएशन कडून गेल्या दोन वर्षांपासून करण्यात येत आहे. या प्रश्नाकडे शासनाकडून आतापर्यंत दुर्लक्ष होत आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अकोला इंडस्ट्रियज असोसिएशनच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन एमआयडीसीच्या हद्दीचा प्रश्न सोडविण्याची विनंती केली होती. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.

‘एमआयडीसी’चा परिसर खदान, बार्शीटाकळी हद्दीत

अकोला ‘एमआयडीसी’चा बराच भाग खदान व बार्शीटाकळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतो. एमआयडीसीत एखादा अनुचित प्रकार घडल्यास पोलिसांशी संपर्क करताना उद्योजकांना अडचणी येतात. बहुतांश वेळा खदान व बार्शीटाकळी पोलिसांना संपर्क करावा लागतो. ही दोन्ही पोलिस ठाणी बऱ्याच अंतरावर असल्याने त्यांचे कोणतेही नियंत्रण एमआयडीसी परिसरात नसल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.

समस्यांमुळे उद्योगांना घरघर

अकोला शहराच्या एमआयडीसीमध्ये अस्तित्वात असलेल्या उद्योगांना समस्यांमुळे घरघर लागली आहे. येथील ३० टक्के उद्योग अलीकडच्या काळात बंद पडले. सुरु असलेल्या अनेक उद्योजकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत नवीन उद्योग कसे येतील हा प्रश्न आहे. नवीन उद्योजकांना सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने ते इतर जिल्ह्यात उद्योग स्थापन करणे पसंत करत आहेत.

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून एमआयडीसीचा परिसर हा एकाच पोलिस ठाण्याच्या हद्दीत समाविष्ट करण्याची मागणी आम्ही करत आहोत. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा परिसर आल्यास उद्योजकांना फायदा होणार आहे. मात्र या मागणीकडे आतापर्यंत दुर्लक्ष होत आले आहे.

- नितीन बियाणी, सचिव,अकोला इंडस्ट्रीज असोसिएशन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com