esakal | पाचही मुलीच झाल्याने तलाक, तलाक, तलाक; पत्नीने दाखल केली तक्रार
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

पाचही मुलीच झाल्याने तलाक, तलाक, तलाक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पथ्रोट (जि. अकोला) : लग्नानंतर पाच मुली जन्माला आल्याचे कारण समोर करून पत्नीला तीन तलाक देण्याच्या प्रकरणी पथ्रोट पोलिसांनी मोहम्मद फारूक मोहम्मद शफी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

येथील आठवडीबाजार परिसरात राहणाऱ्या युवतीचे मोहम्मद फारूक मोहम्मद शफी (रा. माऊली जहागीर) यांच्यासोबत एप्रिल २००५ मध्ये रीतीरिवाजानुसार लग्न झाले होते. तो तिला मुलगा व्हावा म्हणून नेहमी त्रास द्यायचा. त्याच्या घरातील सदस्यही पीडितेला शिवीगाळ करून मारझोड करायचे. सोबतच मुलींच्या पालनपोषणासाठी वडिलांकडून पाच लाख रुपये आणण्यासाठी दबाव टाकला जायचा.

हेही वाचा: सुंदर तरुणी दिवसा करतात स्टाफच काम, रात्री करतात देहव्यापार

दोन्ही मुली झाल्यानंतर होणाऱ्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून पीडितेच्या वडिलांनी मुलगा, जावयाला प्लॉट घेऊन घर बांधून दिले. त्यानंतरही तिला तीन मुली झाल्या. फारूकने आणखीन पैशाची मागणी करीत तिला त्रास देणे सुरूच ठेवले. अखेर या सर्व प्रकरणाला कंटाळून २ ऑक्टोबरला तिच्या वडिलांच्या घरी बैठक घेण्यात आली. त्यात फारूक काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता व तेथेच त्याने तीनवेळा तलाक म्हणून पत्नीशी संबंध तोडले. त्यामुळे पीडितेने पती मो. फारूक, तसेच त्याचे नातेवाईक अशा सहा जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

तीन तलाक अ‍ॅक्टमधील तरतुदीनुसार पतीवर गुन्हा दाखल केला आहे. उर्वरित नातेवाइकांवर तपासाअंती बयानावरून यातील इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात येईल.
- सचिन जाधव, ठाणेदार, पथ्रोट
loading image
go to top