esakal | सुंदर तरुणी दिवसा करतात स्टाफच काम, रात्री करतात देहव्यापार; डान्सबारवर पोलिसांचे छापे
sakal

बोलून बातमी शोधा

देहव्यापार

सुंदर तरुणी दिवसा करतात स्टाफच काम, रात्री करतात देहव्यापार

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : शहरातील अनेक बियरबारमध्ये बारबालांना अश्‍लील नृत्य करायला लावून बारमालक मालामाल होत होते. रात्रभर सुरू असलेल्या बारबालांवर आंबटशौकीनांना पैशाची उधळण करीत होते. ‘शहरात बारमध्ये पुन्हा छमछम’ असे वृत्त दै. ‘सकाळ’ने प्रकाशित करताच पोलिस आयुक्तांनी गांभीर्याने दखल घेऊन बारवर छापेसत्र सुरू केले आहे. त्यामुळे आता बारमालकांनी सावध पवित्रा घेत डान्सबार तुर्तास काही दिवस बंद केला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, गणेशपेठ, कोतवाली, एमआयडीसी, हिंगणा-मोंढा, वाडी, अजनी, हुडकेश्‍वर, नंदनवन, सीताबर्डी आणि कामठीतील अनेक बारमध्ये बारबाला बोलावण्यात आल्या होत्या. काही बारमालकांनी सुगम संगीत अशा गोंडस नावावर बाराबालांचे अश्‍लील नृत्य सुरू केले होते. गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन बार मालकांनी ‘दोन’मध्ये थेट पोलिस अधिकाऱ्यालाच ‘सेट’ केल्याची चर्चा होती. ही बातमी साहेबांपर्यंत पोहोचताच त्या अधिकाऱ्याची चांगली कानउघडणी केली होती.

महिन्याकाठी ‘दोन’चे नुकसान झाल्याने तो अधिकारी आता नाराजी व्यक्त करीत आहे. ‘सकाळ’ने डान्सबारबाबत वृत्त प्रकाशित करून बारबालांचे नृत्य उघडकीस आणले होते. त्यामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी वृत्ताची गांभीर्याने दखल घेतली. लगेच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलवून डान्सबार ताबडतोब कारवाई करण्याचे सत्र सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिस ठाण्यातील डीबी पथक आणि डीसीपी कार्यालयातील पथकांनी ‘वांझोट्या’ रेडही केल्या. हे छापे फक्त पोलिस आयुक्तांचे समाधान करण्यासाठीच आहे, असे कर्मचाऱ्यांना सांगण्यात आल्याने कर्मचारीही बिनधास्त होते, अशी कुणकूण आहे.

हेही वाचा: टॅटू दाखवण्यासाठी श्रुती झाली टॉपलेस; पहा तिची अदा

गोपनियता राहिली नाही

शहरातील डान्सबारवर छापे घालून कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. परंतु, डीसीपी कार्यालयात गोपनियता पाळली गेली नाही. त्यामुळे झोनमधील सर्वच पोलिस कर्मचाऱ्यांसह होमगार्डलासुद्धा कारवाईची माहिती होती. त्यामुळे काही पोलिस कर्मचाऱ्यांनी बारमालकांना तासाभरापूर्वीच अलर्ट केले होते. त्यामुळे छाप्यात काहीही आढळले नाही, अशी चर्चा आहे.

बारला लागली देहव्यापाराची कीड

अंबाझरी, सदर, गिट्टीखदान, वाडी, सीताबर्डीतील काही पब आणि हुक्का पार्लरमध्येही युवा वर्गासाठी विशेष व्यवस्था करण्यात येते. पब आणि पार्लरला देहव्यापाऱ्याची किनार लागलेली आहे. तर काही बारमध्ये बारबाला नसतात पण स्टाफच्या नावावर सुंदर तरुणींची निवड करण्यात येते. मध्यरात्रीनंतर थेट त्या मुली देहव्यापारासाठी सज्ज असतात.

loading image
go to top