

Stray Dog Sterilization Programme Faces Questions Over Lakhs Spent and Lack of Effective Control Despite Municipal Contracts
esakal
अकोला : अकोला महानगरपालिकेकडून शहरातील मोकाट श्वानांची संख्या नियंत्रित करण्यासाठी लाखो रुपये खर्च करून नसबंदीचे कंत्राट दिले जाते. मात्र, प्रत्यक्षात शहरातील श्वानांची वाढती संख्या आणि नसबंदी प्रक्रियेतील कथित अनियमिततांमुळे या संपूर्ण कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नंदुरबार येथील नवसमाज निर्माण बहुउद्देशीय संस्थेला श्वान नसबंदीचे काम देण्यात आले असून, या संस्थेच्या कामकाजात गंभीर त्रुटी असल्याचा आरोप आधार फॉर अनिमल्सच्या संस्थापिका काजल राऊत यांनी केला आहे.