
साखरखेर्डा : सुरुवातीला अवकाळी पावसाने साथ दिल्यानंतर सिंदखेडराजा तालुक्यात शेतकऱ्यांनी सोयाबीन, कपाशी, मका, मूग, उडीद आणि तूर याची मोठ्या प्रमाणात पेरणी केली. ९० टक्के शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण झालेल्या ऐन हंगामात पाऊस गायब झाल्यामुळे आता साखरखेर्डासह परिसरात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. तर शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहे.