Akola : डॉ. धनंजय दातार यांचा महाराष्ट्र शासनातर्फे गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. धनंजय दातार यांचा महाराष्ट्र शासनातर्फे गौरव
डॉ. धनंजय दातार यांचा महाराष्ट्र शासनातर्फे गौरव

डॉ. धनंजय दातार यांचा महाराष्ट्र शासनातर्फे गौरव

अकोला : कारंजा येथील रविवाशी विदर्भ सुपुत्र व दुबईस्थित अलअदील उद्योग समुहाचे अध्यक्ष मसाला किंग डॉ. धनंजय दातार यांचा दुबई येथे महाराष्ट्र शासनातर्फ गौरव करण्यात आला आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कितीही पुरस्कार मिळाले तरी कर्मभूमी दुबईत मायभूमी महाराष्ट्राकडून झालेला सन्मान माझ्यासाठी विशेष मोलाचा आणि जिव्हाळ्याचा आहे. ही शाबासकीची थाप असून, त्यामुळे मला मातृभूमीची सेवा करण्यासाठी अधिक चैतन्य मिळेल, असे प्रतिपादन मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी नुकतेच दुबईमध्ये केले.

दुबई एक्स्पो २०२० या जागतिक प्रदर्शनानिमित्त आयोजित डॅझलिंग महाराष्ट्र या कार्यक्रमात डॉ. दातार यांना महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. त्यानिमित्त डॉ. दातार बोलत होते. महाराष्ट्राच्या उद्योग तथा पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, भारताचे दुबईतील महावाणिज्य दूत (कॉन्सुल जनरल) डॉ. अमन पुरी यांच्यासह उद्योग-व्यापार क्षेत्रातील अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

दुबईतील हयात ग्रँड हॉटेलमध्ये हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. दुबई येथे सध्या एक्स्पो २०२० हे जागतिक औद्योगिक प्रदर्शन सुरू आहे. त्यात भारताचाही सहभाग असून, भारतीय दालनात संस्कृती-विज्ञान-तंत्रज्ञानाचा आविष्कार घडवण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून डॅझलिंग महाराष्ट्र सन्मान मराठी मातीचा या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र राज्यातील गुंतवणुकीच्या संधींना प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक गुंतवणूकदारांसमवेत बैठका या काळात होत आहेत. दुबईच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे वास्तविक एक्स्पो २०२० प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

loading image
go to top