Drunk Driving: पंढरपूर-अकोट एसटी बसचा चालक व वाहक दारूच्या नशेत प्रवास करत असल्याचे उघड झाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. प्रवाशांनी दिलेल्या तक्रारीनंतर बीडमध्ये पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
अकोला : पंढरपूरहून अकोट (जि. अकोला) येथे निघालेल्या एसटी बसमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. बसचा चालक व वाहक यांनी दारूच्या नशेत प्रवास केल्याने तब्बल ३७ प्रवाशांचा जीव धोक्यात आला.