esakal | चक्रीवादळामुळे पाचशे हेक्टरवरील पिके जमीनदोस्त
sakal

बोलून बातमी शोधा

akola

चक्रीवादळामुळे पाचशे हेक्टरवरील पिके जमीनदोस्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव (जा) (जि. बुलडाणा) : कुरणगाड बु, खुर्द, गाडेगाव बु.आणि खुर्द व तरोडा अशा दहा गावांमध्ये (ता.६) दुपारी आलेल्या भयंकर चक्रीवादळाने शेतकऱ्यांची मका कपाशी, कपाशी ही पिके पूर्णतः जमीनदोस्त झाली असून, सुमारे ५४५ हेक्टर क्षेत्राला या वादळाचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज महसूल विभागाने व्यक्त केला आहे. त्यातच या चक्रीवादळाने नुकसान झालेल्‍या भागात सर्वच पक्षाचे नेते रिकाम्या हाताने फक्त कुरणगाड गावाकडे धाव घेत असल्याचे चित्र ७ आक्टोबर रोजी बघावयास मिळाले.

हेही वाचा: लखीमपूर घटनेबाबत खंबीर भूमिका घेतल्यानं राज्यात छापासत्र

जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रसेनजित पाटील, काँग्रेस पक्ष नेत्या स्वाती वाकेकर, जि. प.चे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील, जि. प. विरोधी पक्ष नेते श्रीराम पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रशांत डिक्कर, शिवसेना जिल्हा सह संपर्क प्रमुख दत्ता पाटील, तालुका शिवसेना प्रमुख, तालुका काँग्रेस अध्यक्ष अविनाश उमरकर, तालुका भाजप अध्यक्ष प्रकाश पाटील, तालुका शिवसेना प्रमुख गजानन वाघ, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रशांत दाभाडे, वंचितचे तालुकाध्यक्ष संतोष गवई यांच्यासह विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बाधित क्षेत्राला भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

हेही वाचा: Drugs Case: आर्यन खानसह ८ आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी

कधी नव्हे एवढी नैसर्गिक आपत्ती आल्याने परिसरातील शेतकरी पूर्ण खचून गेला असून या शेतकऱ्यांना तत्काळ सरसकट मदत करावी, अशी भूमिका यावेळी खासदार प्रतापराव जाधव यांनी घेतली व युद्ध स्तरावर पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले. तहसीलदार शीतल सोलाट, नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, तलाठी यांनी पिकाचे प्राथमिक पंचनामे सुरू केले असून पूर्ण पंचनामे अंती नुकसानीचा अंदाज येईल, यानंतर शेतकऱ्यांना द्यावयाच्या आर्थिक मदतीचा प्रस्ताव जिल्हास्तरावर पाठवण्यात येईल असे उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांनी सांगितले.

"संपूर्ण महसूल प्रशासन नुकसानग्रस्त दहा गावातील पंचनामे करण्याच्या कामी गुंतले असून नुकसान ग्रस्त भागातील सर्व शेतीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहेत. कुठलाही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी आपण घेत असून दहा गावातील ५४५ हेक्टर जमीन बाधित झाली असून येत्या आठवड्याभरात हे चौकशी व पंचनाम्याचे काम पूर्ण होऊन संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा होईल."

- शीतल सोलाट, तहसीलदार

loading image
go to top