Bike Accident: मलकापूर पांगरा-दुसर बीड मार्गावर हॉटेल सातबारा समोर झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार झाले. रिंग रोडवरील दिशादर्शक फलक नसल्याने हा अपघात झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
दुसरबीड : मलकापूर पांगरा ते दुसर बीड रोडवर वरील हॉटेल सातबारा जवळ दुचाकीचा अपघात होऊन दोन जण ठार झाल्याची घटना शुक्रवारी (ता. ३१) सायंकाळी आठ वाजताच्या दरम्यान घडली.