Maharashtra Police: कर्तव्याच्या मैदानातून टेनिस कोर्टवरही बाज; डीवायएसपी शंकर शेळके यांनी उंचावला ‘लोहमार्ग’चा मान

Railway Police Officer Shankar Shelke Makes Mark in Tennis: कर्तव्य आणि क्रीडा यांचा समतोल साधत डीवायएसपी शंकर शेळके यांची टेनिसमध्ये चमकदार कामगिरी
Shankar Shelke Excels in Tennis Alongside Police Duties Brings Recognition to Maharashtra Railway Police Department

Shankar Shelke Excels in Tennis Alongside Police Duties Brings Recognition to Maharashtra Railway Police Department

esakal

Updated on: 

अकोला : बेंगळुरू येथे आयोजित २७ व्या ऑल इंडिया लॉन टेनिस चॅम्पियनशिप (एआयपीएलटीसी २०२६) मध्ये अकोला लोहमार्ग विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी (डीवायएसपी) शंकर शेळके यांनी सहभाग नोंदवित महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. देशभरातील केंद्रीय सशस्त्र पोलिस दल आणि विविध राज्यांच्या पोलिस दलांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून निवड झालेल्या सहा अधिकाऱ्यांमध्ये श्री. शेळके यांचा समावेश होता.

Loading content, please wait...