अकोला : ‘ती’ ई-ट्रायसिकल धोक्याची

चौथ्याच दिवशी दिव्यांग फिरते विक्री केंद्र तुटले
तुटलेली ई-ट्रायसायकल.
तुटलेली ई-ट्रायसायकल.Sakal
Updated on

मूर्तिजापूर - दिव्यांग बांधवांना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने देण्यात आलेले फिरते विक्री केंद्र वाटप झाल्याच्या चौथ्याच दिवशी मोडून पडले असून, त्यांच्या निर्मिती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. शहरातील त्रिमूर्ती नगरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती योजनेंतर्गत सुमारे अडीच कोटी रुपयांच्या १२ विकास कामांचे भूमीपूजन व १४ दिव्यांग लाभार्थ्यांना माविम उपक्रमांतर्गत फिरते विक्री केंद्र ट्रायसिकलचे वाटप राज्यमंत्री, अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते गत चार दिवसांपूर्वी करण्यात आले होते.

जिल्हा वार्षिक योजनेतील नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत मूर्तिजापूर तालुक्यातील १४ दिव्यांग लाभार्थ्यांना फिरते विक्री केंद्र ई-ट्रायसिकल गाड्यांचे वाटप करण्यात आले होते. दिव्यांग बांधावांना व्यवसाय करून उपजिविकेचे साधन उपलब्ध करून देण्याचा उद्देश या योजनेमागे आहे. परंतु, एका दिव्यांग बांधवाच्या जिवावरच हा उद्देश उठल्याचे पाहवयास मिळाले. या उपक्रमाचे लाभार्थी जितापूर खेडकर येथील राजाभाऊ रामराव तायडे यांनी त्यांना मिळालेल्या ई-ट्रायसिकलच्या सहाय्याने कटलरीचा व्यवसाय सुरू केला, मात्र हे फिरते विक्री केंद्र राजाभाऊंच्या जिवावरच उठले. शहरातील रेल्वे उड्डाणपुलावरून तहसीलकडे जाणाऱ्या रस्त्यावरून जात असताना एक रपटा पार करत असतानाच त्यांची तीनचाकी सायकल मोडून पडल्याने तिचे दोन तुकडेच झाले. सुदैवाने राजाभाऊंना इजा पोचली नाही.

चौकशी होणे आवश्‍यक

अशा पद्धतीने सदोष ई-ट्रायसिकलींचा पुरवठा करून दिव्यांग बांधवांना मदतीचा हात देण्याच्या शासनाच्या उपक्रमाला गालबोट लावण्याचा प्रकार घडत असेल, तर या पुरवठादार व निर्मिती कंपन्यांची चौकशी होणे गरजेचे आहे. सदोष तीनचाकी सायकलींचा पुरवठा होणाऱ्या प्रक्रीयेत नेमकी त्रुटी राहिली की, गैरप्रकार झाला याबाबत चौकशी होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

या ई-ट्रायसिकल आहेत, त्यामुळे सुरू झाल्यानंतरही लक्षात येत नाहीत. काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या चालवू नका, रहदारीत नेऊ नका, लवकरच विमा काढल्या जाणार आहे, अशा सूचना लाभार्थ्यांना दिल्या होत्या. ठाकूर ॲग्रो एजन्सीने त्या बनविल्या असून, ही मोडलेली ई-ट्रायसीकल ते बदलवून किंवा दुरूस्त करून देतील.

- वर्षा खोब्रागडे, डीसीओ, माविम.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com