esakal | खासदार भावना गवळी यांच्या मालमत्तांवर ईडीची कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

खासदार भावना गवळी

खासदार भावना गवळी यांच्या मालमत्तांवर ईडीची कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाशीम : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्रकार परिषदेनंतर दहाव्या दिवशी खासदार भावना गवळी यांच्या विविध प्रतिष्ठानांवर सक्तवसूली संचालनालयाने छापेमारी केली होती. त्यानंतर तिसऱ्याच दिवशी ईडीच्या अधिकाऱ्यांनी येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयात खासदार भावना गवळी यांच्या संस्थांच्या संदर्भात कागदपत्राची तपासणी केल्याची माहिती समोर आली आहे. ईडीने खासदार भावना गवळी यांना अजून कोणतीही नोटीस बजावली नाही. या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा होत आहे.

हेही वाचा: शाळांसाठीच्या योजनांमध्ये वारंवार बदल, चारदा बँका बदलल्या

चार दिवसांपूर्वी खासदार भावना गवळी यांच्या रिसोड शहरातील रिसोड अर्बन क्रेडिट सोसायटी आणि देगाव येथील आयुर्वेदिक कॉलेज आणि बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यावर ईडीची कारवाई झाली होती. या कारवाईनंतर तीनच दिवसाचा कालावधी उलटून गेल्यानंतर येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयात दुपारी सक्तवसूली संचालनालयाचे अधिकारी दाखल झाले. या अधिकाऱ्यांनी खासदार भावना गवळी यांच्या संदर्भातील संबंधित संस्थांची नोंदणी व सभासदाबाबत कागदपत्रे तपासल्याची माहिती समोर आली आहे. ईडीच्या या दुसऱ्या कारवाईने जिल्ह्याच्या राजकीय व सामाजिक पटलावर घडामोडींना वेग आला आहे.

अनेक तर्कवितर्काला आले उधाण-

खासदार भावना गवळी यांच्यावर झालेली ईडीची कारवाई राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली होती. यामध्ये भारतीय जनता पक्ष राजकीय सूड उगवत असल्याचा तसेच आणीबाणीगत परिस्थिती निर्माण करीत असल्याचा आरोप खासदार भावना गवळी यांनी केला होता तसेच भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांच्यावरही आरोप केले होते. आता पुन्हा ईडीचे पथक जिल्ह्यात आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात दुपारनंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून, अनेक दिग्गज एकत्र बसून चर्चा करीत असल्याने हे प्रकरण गंभीर वळणावर येऊन ठेपले आहे.

हेही वाचा: नागपूर : मातृवंदना योजना ठरतेय महिलांसाठी वरदान

"केंद्रातील भाजप सरकार केंद्रीय तपास संस्थांचा गैरवापर करीत आहे. वाशीम जिल्ह्यातील खासदार भावना गवळी यांच्या विरोधातील ईडीची कारवाई राजकीय हेतूने प्रेरित आहे. भाजपला मराठी नेतृत्व संपवायचे आहे. मात्र, जनतेच्या न्यायालयात याचा फैसला होणार आहे. लोकप्रिय मराठी नेतृत्व संपविण्याचा आखलेला डाव मराठी माणूस सहन करणार नाही. न्यायालयात प्रकरण सुरू असताना न्यायाधीशाची भूमिका घेणे नियमबाह्य आहे. मराठी नेतृत्वाला संपविण्याचा कट आम्ही उधळून लावू."

- हुकूम तुर्के, जिल्हा समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा

loading image
go to top