

Teachers reacting to the education department’s order assigning them stray dog control responsibilities.
Sakal
अकोला : गुरूची महती हीच खरी भारतीय संस्कृती असे म्हटल्या जाते. मात्र या संस्कृतीला आता शिक्षण विभागाकडून तिलांजली दिल्या जात असल्याचे चित्र महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात निर्माण झाले आहे. आता भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी शिक्षकांना जुंपल्या जाणार आहे. या कामी शिक्षकांना नोडल अधिकारी म्हणून नेमले जाणार असून त्यांच्या नावाची पाटी शाळेच्या दर्शनी भागात लागणार आहे. राज्याच्या शिक्षण संचालनालयाने हा अफलातून आदेश जारी केल्याने याचा प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आंदोलनाचा इशारा दिला आहे.