Eid Celebration : अकोला जिल्ह्यात ईद उत्साहात साजरी; आमदार साजिद खान पठाण यांचा सहभाग, मुस्लिम बांधवांना दिल्या शुभेच्छा
Sajid Khan : अकोला येथे ईद-उल-फितर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, मशिदी आणि ईदगाहांमध्ये नमाज अदा करण्यात आली. आमदार साजिद खान पठाण यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
अकोला : ईद-उल-फितरचा सण धार्मिक उत्साह आणि बंधुत्वाच्या वातावरणात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. शहरातील सर्व मशिदी आणि ईदगाहांमध्ये हजारो मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज अदा करून अल्लाहचे आभार मानले.