60 ते 80 वयोगटातील व्यक्तींचे जिल्ह्यात 60 टक्के बळी

55.jpg
55.jpg
Updated on

अकोला ः जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असताना कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दरम्यान आतापर्यंत कोरोनामुळे बळी गेलेले 60 टक्के रुग्ण हे 60 ते 80 या वयोगटातील असून, त्यांच्यात मधुमेह, हृदय व मुत्रपिंडासंदर्भातील जुन्या व्याधींची लक्षणे आढळल्याचे वैद्यकीय सूत्रांचे म्हणणे आहे. एक रुग्ण वगळता मृत्यू झालेले सर्व रुग्ण हे 40 वर्षांपुढील आहेत.

वैद्यकीय सूत्रांच्या माहितीनुसार, बाधिताच्या संपर्कात आल्याने सर्वच वयोगटातील नागरिकांना कोरोनाची लागण होते. मात्र ज्येष्ठ नागरिकांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांच्यात लवकर लक्षणे दिसतात. अनेक ज्येष्ठांमध्ये जुन्या व्याधी असल्याने त्यांच्या लक्षणे अधिक तिव्रतेने आढळतात. तेच युवकांमध्ये लक्षणे दिसत नसल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे शक्यतो 60 वर्ष वयोगटापुढील नागरिकांनी बाहेर पडणे टाळायला हवे, याशिवाय जुन्या व्याधी असणाऱ्यांनीही गर्दी किंवा बाहेर फिरणाऱ्या व्यक्तीपासून स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन डाॅक्टरांकडून करण्यात येते.

वयोगटानुसार मृत्यूचे प्रमाण
- 37 वर्षीय एक रुग्ण
- 40 ते 50 वर्षीय ः 06
- 51 ते 60 वर्षीय ः 06
- 61 ते 70 वर्षीय ः 10
- 71 ते 80 वर्षीय ः 05
-- 
स्त्री-पुरुष प्रमाण
13 महिला
17 पुरुष

60 वर्षांपुढील व्यक्तींचे सर्वाधिक मृत्यू
आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार 40 ते 80 वर्षे वयोगटातील रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये सर्वाधित मृत्यू हे 60 वर्षे वयोगटातील नागरिकांचे झाल्याचे दिसते. वयस्क नागरिकांना लवकर लागण होऊन उपचारास विलंब झाल्यास मृत्यू ओढावू शकतो. दरम्यान अनेक रुग्णांचा अहवाल मृत्यूनंतर कोरोना पाॅझिटिव्ह आला आहे, अशीही वैद्यकीय सूत्रांची माहिती आहे.

असे झाले मृत्यू
जिल्ह्यात 7 एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. एप्रिल अखेरपर्यंत कोरोनामुळे दोन बळी गेले होते. मात्र मे महिन्याच्या सुरुवातीपासून पाॅझिटिव्ह रुग्णांबरोबर बळींचा आकडाही वाढत गेला. काही दिवसांत तब्बल 30 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

असा वाढत गेला बळींचा आकडा
तारीख -        वय
15 एप्रिल ः 45 (पुरुष)
29 एप्रिल ः 42 (महिला)
1 मे ः 56 (पुरुष)
2 मे ः 79 (पुरुष)
3 मे ः 55 (महिला)
3 मे ः 60 (महिला)
6 मे ः 65 (पुरुष)
6 मे ः 77 (महिला)
6 मे ः 65 (महिला)
6 मे ः 70 (पुरुष)
8 मे ः 78 (महिला)
10 मे ः 50 (महिला)
11 मे ः 65 (पुरुष)
13 मे ः 65 (महिला)
15 मे ः 65 (महिला)
15 मे ः 37 (महिला)
17 मे ः 48 (पुरुष)
19 मे ः 68 (पुरुष)
19 मे ः 62 (पुरुष)
21 मे ः 68 (पुरुष)
22 मे ः 50 (महिला)
22 मे ः 52 (पुरुष)
24 मे ः 60 (महिला)
25 मे ः 40 (महिला)
26 मे ः 56 (पुरुष)
26 मे ः 71 (पुरुष)
26 मे ः 66 (पुरुष)
28 मे ः 80 (पुरुष)
30 मे ः 71 (पुरुष)
31 मे ः 60 (पुरुष)
31 मे ः 65 (पुरुष)

ज्येष्ठांसाठी काही सूचना
- घरातून बाहेर पडू नये. बाहेरच्या व्यक्तींना बेफिकीरीने घरात येऊ नये.
- कामासाठी कोणाला भेटतान त्याच्यापासून एक मीटर अंतर ठेवा.
- जीवनावश्यक खरेदीसाठी घरातील इतरांना बाहेर जाऊ द्या, शेजार्‍यांची मदत घ्या.
- घरात केवळ बसून किंवा पडून राहू नका, थोड्या-थोड्या वेळाने चालत राहा.
- सोम्य व्यायाम व योगासने करा, वैयक्तिक स्वच्छता पाळा.
- रोजच्या जेवणात घरी बनवलेले ताजे अन्न घ्या, भरपूर पाणी प्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Mahabeej Seeds Complaint
45 days without rain in Telhara
Wadegaon College Case
Western Vidarbha Crop Damage
Marathi News Esakal
www.esakal.com