
अकोला : सहकार क्षेत्रातील निवडणुकीचा बिगुल वाजला!
तेल्हारा: वाढत्या कोरोनाच्या(Corona) संसर्गामुळे लांबणीवर पडलेल्या सहकार क्षेत्रातील निवडणुकीचा(election) अखेर बिगुल वाजला असून, तेल्हारा तालुक्यातील एक सोसायटीसह तीन सेवा सहकारी संस्थांच्या प्राथमिक मतदार याद्या जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अकोला(Akola) यांच्या आदेशान्वये प्रसिद्ध झाल्या असून, १९ ते २८ जानेवारीपर्यंत मतदार यादीवर आक्षेप नोंदविण्याची वेळ दिली आहे.
हेही वाचा: अकोला: ज्वारी उपेक्षितच; हमीभावापेक्षा निम्माही भाव मिळेना
तेल्हारा तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी म. तेल्हारा (मतदार संख्या २,५६०), सेवा सहकारी संस्था म. नेर (मतदार संख्या ७९४), सेवा सहकारी संस्था म. मनात्री (मतदार संख्या २४२),सेवा सहकारी संस्था म. जाफ्रापूर (मतदार संख्या ११४) या ‘ब’ प्रवर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुका २०२२ च्या प्राथमिक मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र सहकारी संस्था (समिती निवडणूक) नियम २०१४ चे नियम ६ ते ८ च्या तरतुदीनुसार संस्थेच्या संचालक मंडळ निवडणुकीकरिता प्राथमिक मतदार याद्या प्रसिद्धीचा कार्यक्रम तयार करण्यात आला असून, १९ जानेवारी रोजी प्राथमिक मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या याद्या सभासद-मतदारांना पाहणीकरिता उपलब्ध करून देऊन प्रसिद्धी अहवाल २० जानेवारी रोजी सादर करावा.
हेही वाचा: MSEDCL : वीज बिले वसुलीसाठी समिती
सदर मतदार यादीची एक प्रत ग्रामपंचायत कार्यालयातील नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात यावी, सोबत जोडलेला प्रसिद्धी अहवाल व पंचनामा करून प्रत कार्यालयास सादर करावी, संबंधित गावांत दवंडी देण्यात येऊन आवश्यक ती प्रसिद्धी करण्यात यावी, प्रसिद्ध प्राथमिक मतदार यादीवर आक्षेप, दावे फक्त संबंधित कार्यालयाकडेच स्वीकारण्यात येतील असे, जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अकोला यांनी जाहीर केला आहे.
सहकार नेते झाले सक्रीय
सहकार क्षेत्रातील अतिशय महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी-विक्री सहकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती बँक आदी महत्त्वपूर्ण संस्थांवर वर्चस्व सिद्ध करावयाचे असल्यास सेवा सहकारी संस्था, सोसायट्या, ग्रामपंचायती ताब्यात असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रातील सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुका ही प्रथम पायरी असल्यामुळे सहकार क्षेत्रातील सर्वच गट व नेते सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे.
Web Title: Election Co Operative Trumpet Sounded
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..