पटोलेंविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा : विनोद वाघ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Vinod Wagh

पटोलेंविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा : विनोद वाघ

सिंदखेड राजा (जि. बुलडाणा) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्याप्रकरणी भाजप आक्रमक झाला असून, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांनी निषेध नोंदवला आहे. नाना पटोले च्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप आक्रमक झाला आहे. पटोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपच्या वतीने केली आहे.भाजप पदाधिकाऱ्यांनीही ठिकठिकाणी पटोले यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.(File a case of treason against Nana Patole)

हेही वाचा: पोलिस उपधीक्षक मिटकेंना "सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी" पुरस्कार

नाना पटोले यांनी मोदींबद्दल केलेले वक्तव्य निंदनीय असून, कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणारे आहे, असे भाजप विनोद वाघ यांचेम्हणणे असून, त्यांनी निषेध व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाचे बरेवाईट व्हावे यासाठी ठिकठिकाणी कॉंग्रेसकडून जो प्रयत्न सुरू आहे, त्याचाच एक भाग म्हणून नाना पटोले असे बोलले तर नाही ना? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा: अनिल देशमुखांची कोठडी संपेना! आणखी १४ दिवसांची वाढ

मोदी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्या प्रकरणी पटोले यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी, व यापुढे नाना पटोले यांनी अशी वायफळ बडबड थांबवली नाही तर त्यांचे परिणाम नाना पटोले यांना भोगावे लागतील असा इशारा भाजपा महाराष्ट्र प्रवक्ते व युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विनोद वाघ यांनी दिला आहे.

Web Title: File A Case Of Treason Against Nana Patole Vinod Wagh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :AkolaNana PatoleTreason