crime | धारदार शस्त्राने वार करून इलेक्ट्रॉनिक दुकान मालकाचा केला खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

murder

धारदार शस्त्राने वार करून इलेक्ट्रॉनिक दुकान मालकाचा केला खून

चिखली : धारदार शस्त्राने वार करून सशस्त्र दरोडा टाकून आनंद इलेक्ट्रॉनिक्स च्या दुकान मालकाचा अज्ञात दरोडेखोरांनी खून केला असून दरोडेखोर सी.सी.टिव्ही त कैद झाले आहेत. बुलडाणा जिल्ह्याच्या चिखली शहरामध्ये मन हेलावून टाकणारी घटना जयस्तंभ चौकातील आनंद इलेक्ट्रॉनिक येथे आज ता. 16 नोव्हेंबर च्या रात्री 9:45 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आनंद इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सशस्त्र दरोडा टाकून दोन दरोडेखोरांच्या हल्ल्यात दुकान मालक कमलेश पोपट वय 55 वर्ष यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण चिखली शहरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.

हेही वाचा: हवेली पोलिसांचं 'वरातीमागून घोडं'; अखेर पोलीस अधीक्षकांनी घातलं लक्ष

आनंद इलेक्ट्रॉनिक्सचे मालक कमलेश पोपट आज मंगळवारी रात्री 9.45 वाजेच्या सुमारास त्यांनी आपली दुकानाचा मुख्य शटर बंद करून बाजूचा लहान शटर आर्धा उघडा ठे होता तेव्हा तीन अज्ञात दरोडेखोर एका दुचाकीवर आले त्यातील दोन जण ग्राहक बनून दुकानाच्या आत आले व त्यांनी कमलेश पोपट यांच्यावर धारदार शस्राने हल्ला करुन रोख रक्कम लुटून पसार झाले. जखमी अवस्थेत कमलेश पोपटी यांना चिखलीतील एका खासगी रुग्णालयात देण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे. घटना स्थळी पुलिस श्वान पथक, स्थानिक गुन्हे शाखेचे बळीराम गीते चिखली चे ठाणेदार अशोक लांडे दाखल झाले असून आरोपींचा शोध घेत आहेत..

loading image
go to top