अकरा रेल्वे गाड्या रद्द; प्रवाशांना फटका

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता उपाययोजना
अकरा रेल्वे गाड्या रद्द; प्रवाशांना फटका

अकोला ः राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे सर्वत्र कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दरम्यान सदर निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने ११ रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. त्याचा फटका मात्र आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना बसला आहे.

लॉकडाऊननंतर मिशन बिगीन अगेन अंतर्गत रेल्वे प्रशासनाने रेल्वे गाड्या सुरू केल्या होत्या. परंतु केवळ आरक्षित तिकीट घेवून जाणाऱ्यांनाच प्रवास करता येऊ शकत होते. उत्सव विशेष व इतर रेल्वे गाड्या सुरू झाल्यामुळे रेल्वे मध्ये पुन्हा एकदा प्रवाशांची वर्दळ वाढली होती. परंतु आता कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यामुळे रेल्वे प्रशासनाने ११ रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. त्याचा फटका स्थानिक प्रवाशांना बसत आहे.

अकरा रेल्वे गाड्या रद्द; प्रवाशांना फटका
मुख्यमंत्र्यांच्या ‘मोफत’ शिवभोजन थाळीने ठेवले अनेकांना उपाशी!

दरम्यान रेल्वे प्रशासनाने गाडी क्रमांक ०२०४१ पुणे -नागपूर विशेषच्या फेऱ्या २९ एप्रिलपर्यंत रद्द राहतील. गाडी क्रमांक ०२०४२ नागपूर-पुणे विशेषच्या फेऱ्या ३० एप्रिलपर्यंत रद्द राहतील. गाडी क्रमांक ०२२३९ पुणे-अजनी विशेषच्या फेऱ्या १ मे २०२१ पर्यंत रद्द राहतील. गाडी क्रमांक ०२२४० अजनी-पुणे विशेषच्या फेऱ्या १८ एप्रिल २०२१ पासून २ मे पर्यंत रद्द राहतील.

अकरा रेल्वे गाड्या रद्द; प्रवाशांना फटका
अकोल्यात हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणार : बच्चू कडू

गाडी क्रमांक ०२११७ पुणे-अमरावती विशेषच्या फेऱ्या २१ एप्रिल ते २८ एप्रिलपर्यंत रद्द राहतील. गाडी क्रमांक ०२११८ अमरावती-पुणे विशेषच्या फेऱ्या २२ एप्रिलपासून २९ एप्रिल पर्यंत रद्द राहतील.ग गाडी क्रमांक ०२०३६ नागपूर-पुणे विशेषच्या फेऱ्या १७ ते १ मे पर्यंत रद्द राहतील. गाडी क्रमांक ०२०३५ पुणे- नागपूर विशेषच्या फेऱ्या २९ एप्रिलपर्यंत रद्द राहतील.

अकरा रेल्वे गाड्या रद्द; प्रवाशांना फटका
बापरे! अकोल्या जिल्ह्यात भूकंपाचे धक्के; तीव्रता कमी असल्यानं जीवितहानी नाही

गाडी क्रमांक ०११३७ नागपूर-अहमदाबाद विशेषच्या फेऱ्या २१ ते २८ एप्रिलपर्यंत रद्द राहतील. गाडी क्रमांक ०११३८ अहमदाबाद-नागपूर विशेषच्या फेऱ्या २२ ते २९ एप्रिलपर्यंत रद्द राहतील. गाडी क्रमांक ०२२२३ पुणे-अजनी विशेषच्या फेऱ्या २३ ते ३० एप्रिलपर्यंत रद्द राहतील.

संपादन - विवेक मेतकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com