Teacher Transfer: आमच्या मॅडम परत आणा! 'शिक्षिकेची बदली रद्द करण्यासाठी चिमुकल्यांचा आक्रोश'; शाळेत जाणेच केलं बंद..

Heartfelt Appeal: शिक्षिका निता बिडवे यांची बदली झाली असली तरी विद्यार्थ्यांना ही बाब काही मान्य नाही, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. मुलांनी शाळेतही जाणे सोडले आहे. आता बिडवे मॅडम आपल्या शाळेत येणार नाहीत, असे कळताच विद्यार्थ्यांनी शाळेत जाणेच बंद केले आहे.
“Children protest emotionally against their teacher’s transfer, demanding her return to the village school.”

“Children protest emotionally against their teacher’s transfer, demanding her return to the village school.”

Sakal

Updated on

अकोला: तालुक्यातील मोरगाव भाकरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या शिक्षिका निता बिडवे यांच्या बदलीमुळे शाळेत जाणेच बंद केले. एवढेच नव्हे तर ‘आमच्या मॅडम परत आणा, नाहीतर आम्ही अभ्यास करणार नाही अन् शाळेतही जाणार नाही, असा हट्ट पालकांमध्ये धरला. शेवटी पालकांनी विद्यार्थ्यांना घेऊन मंगळवारी (ता.१६) मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांची भेट घेतली. मुलांच्या भविष्यासाठी शिक्षिका बिडवे यांची बदली रद्द करण्याची आग्रही मागणी त्यांनी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com