esakal | माजी मंत्री मखराम पवार यांच्या पत्नीचे अतिक्रमण
sakal

बोलून बातमी शोधा

माजी मंत्री मखराम पवार यांच्या पत्नीचे अतिक्रमण

माजी मंत्री मखराम पवार यांच्या पत्नीचे अतिक्रमण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बार्शीटाकळी ः गटविकास अधिकारी, पंचायत समिती, बार्शीटाकळी यांना दिलेल्या आदेशनुसार माजी मंत्री मखराम पवार यांच्या पत्नीने केलेले बेकायदेशीर अतिक्रमण काढण्यात येणार आहे. तालुक्यातील साखरवीरा येथील गावठानच्या साडेसात एकर जमिनीवर इमारत उभारून व तारेचे कुंपण घालून त्यावर माजी मंत्री मखराम पवार यांच्या पत्नी सुमन मखराम पवार यांनी गावठाण जमिनीवर गैरकायदेशीर अतिक्रमण केले असल्याची तक्रारकर्ते अविनाश किसन राठोड यांनी तहसीलदार बार्शीटाकळी यांच्याकडे दिली होती. (Encroachment of former minister Makharam Pawar's wife)

या तक्रारीची शहानिशा करून तहसीलदार बार्शीटाकळी यांनी गटविकास अधिकारी यांना तत्काळ अतिक्रमण काढण्याचे निर्देश दिले होते. त्या आदेशानुसार बिडीओंनी तत्काळ आदेशाची अंमलबजावणी करीत साखरविरा येथील ग्रामसेवक यांना मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ५३ व त्याखालील नियमानुसार तात्काळ अतिक्रमण काढण्याची कारवाई सात दिवसाच्या आत तातडीने करावी, अन्यथा आपण आपले कर्तव्य बजावण्यास कसूर करीत आहात म्हणून आपणाविरूद्ध अपात्रतेची कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.

हेही वाचा: कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू; सात नवे पॉझिटिव्ह

सुमन मखराम पवार या माजी मंत्री मखराम पवार यांच्या पत्नी असून, त्या स्वतः जनता ज्ञानोपासक मंडळ, लोगड या संस्थेच्या कोषाध्यक्ष असून, मखराम पवार हे अध्यक्ष आहेत. ह्या संस्थेद्वारे साखरविरा येथील विमुक्त जाती भटक्या जमाती प्राथमिक आश्रम शाळा व वसराम नाईक आडे माध्यमिक व उच्चमाध्यमिक आश्रम शाळा चालविली जाते. याशाळा चालविण्याकरिता अतिक्रमित जागेवर सुमन मखराम पवार यांनी तब्बल एक दोन नव्हे तर २४ वर्गखोल्या, दोन कार्यालय, १२ बाथरूम, १२ स्वच्छालये व एक स्वयंपाक खोली अशा एकूण ५१ खोल्या असलेली भव्य इमारत उभारून परिसराला तारेचे कुंपण करून सदर इमारत ही स्वतःच्या मालकीची असल्याचे भासवून इमारत आश्रमशाळेला भाड्याने देऊन सुमन मखराम पवार यांनी मा. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी, कार्यालय अकोला यांच्याकडून आजपर्यंत भाड्याच्या स्वरूपात कोट्यावधी रुपयांची कमाई केली असल्याचा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे. यासंदर्भात संबंधितांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

संपादन - विवेक मेतकर

Encroachment of former minister Makharam Pawar's wife

loading image