
कोरोना विषाणू कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर मार्चपासून सुरू असलेल्या लॉकडाउनमध्ये साडेचार महिन्यानंतर मोठी सुट देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने लॉकडाउन-३ ची नियमावली जाहीर करताना आठवड्यातील सहा दिवस सम-विषम बंद केली असून, रविवारी मात्र पूर्ण संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे.
अकोला : कोरोना विषाणू कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर मार्चपासून सुरू असलेल्या लॉकडाउनमध्ये साडेचार महिन्यानंतर मोठी सुट देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने लॉकडाउन-३ ची नियमावली जाहीर करताना आठवड्यातील सहा दिवस सम-विषम बंद केली असून, रविवारी मात्र पूर्ण संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे.
कोरोनामुळे साडेचार महिने संपूर्ण व्यवहार प्रभावित झाले होते. आता हळूहळू अनलॉक करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. १ जुलैपासून सुरू झालेल्या अनलॉकमध्ये पहिल्या दोन टप्प्यात अकोला जिल्ह्यात फारशी मोकळीक देण्यात आली नव्हती. आता तिसऱ्या अनलॉकमध्ये मात्र व्यावसायिकांसह नागरिकांनाही मोठा दिलासा देण्यात आला आहे.
अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा
१ ऑगस्टपासून अकोला शहरातील सम-विषम पद्धतीने व्यवसाय करण्यासाठी दुकाने उघडण्याची पद्धत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सोमवार ते शनिवारपर्यंत सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सर्वच व्यापाऱ्यांना त्यांची दुकाने उघडून व्यवसाय करता येणार आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अनलॉक तीनची नियमावली जाहीर करताना ही घोषणा केली आहे. मात्र ऑगस्टमधील सर्व चारही रविवारी संपूर्ण संचारबंदी राहाणार आहे. त्यामुळे रविवारच्या बाजारात होणारी गर्दी टाळून कोरोना विषाणूच्या होणाऱ्या संसर्गावर नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे.
व्यापाऱ्यांची मागणी मान्य
केंद्र व राज्य शासनाने १ ऑगस्टपासून जाहीर केलेल्या नव्या नियमावलीला अनुसरून अकोला जिल्ह्यातही व्यवसाय करण्यासाठी सम-विषम पद्धत बंद करण्यात यावी, अशी मागणी विविध व्यापारी संघटना, वंचित बहुजन आघाडी व विदर्भ चेंबरतर्फे करण्यात आली होती. त्यांची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य करून आठवड्यातील सहा दिवस सम-विषम पद्धत बंद करून संपूर्ण दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे.
या राहतील सवलती
- मद्यविक्री पूर्वीच्या आदेशानुसार सुरू राहिल.
(संपादन - विवेक मेतकर)