
अकोला : प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील २७ हजार ४१३ लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीपत्र, तसेच २१ हजार ६२७ लाभार्थ्यांना पहिल्या हप्ता मिळाला आहे. अद्यापही ज्यांना घर नाही अशा जिल्ह्यातील प्रत्येक गरजू व्यक्तीला आवास योजनेतून हक्काचे घर मिळवून देऊ, अशी ग्वाही राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दिली.