अकोला : क्रीडा साहित्य महागल्याने खेळाडूंना आर्थिक फटका

जानेवारी महिन्यापासून जीएसटी वाढ; वाहतुकही महागली
Sport equipment
Sport equipmentsakal

अकोला : गत वर्षीच्या अखेरीस शासनाकडून कोरोनाच्या नियमावलीत काही बदल करून दिल्याने विद्यार्थ्यांसाठी शाळा-महाविद्यालये, जीम, सिनेमागृह, हॉटेल, क्रीडांगण खुली करून दिली आहेत. त्यामुळे पोलिस, भारतीय सैनिकमध्ये आपले भविष्य पाहणाऱ्या आणि क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी करून नाव उज्ज्वल करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूंसाठी आनंदासह दुःखाचीही बातमी ऐकावी लागली.

Sport equipment
जळगाव : जिल्ह्यातील १४ वाळू लिलाव गटाची जनसुनावणी

त्याच काळात डिझेलचे दर वाढल्यामुळे वाहनधारकांना वाहतुकीतही नाईलाजाने वाढ करावी लागली. वाहतुकीचे दर वाढल्यामुळे व्यावसायिकांनाही आधी मिळणाऱ्या वस्तू महाग मिळू लागल्याने त्यांनी ग्राहकांसाठी दहा ते पंधरा टक्के वाढ करून दिली. ही वाढ भावी खेळाडूंना आर्थिक फटका देणारी ठरत आहे.संबंधित व्यावसायिकांना क्रीडा साहित्य मेरठ, पंजाब, जालंदर, हरिणा, लुधियाना या ठिकाणावरून आणावे लागते. याच ठिकाणी आधी मिळणारे क्रीडा साहित्यात वाढ आणि वाहतुकीत केलेल्या वाढीमुळे स्थानिक व्यावसायिकांनाही दहा ते पंधरा टक्के वाढ करून साहित्याची विक्री करावी लागत आहे. यामुळे क्रीडा साहित्यात होणारी विक्री मंदावली असल्याचे क्रीडा साहित्य विक्री प्रतिष्ठाणवरील गर्दीवरून दिसून येते.

गत वर्षी क्रीडा साहित्यावर पाच टक्के जीसटी होता परंतु, १ जानेवारीपासून यामध्ये वाढ करून १२ टक्क्यावर गेल्यामुळे व्यावसायिकांनाही फटका बसला आहे. आधी १८० रुपये प्रतिकिलो दराने मिळणारा कापड २२० रुपये प्रतिकिलो झाल्याने विविध खेळात खेळाडूंकडून वापरल्या जाणाऱ्या ड्रेसमध्येही वाढ झाली आहे. नोव्हेंबर-२०२१ मध्ये ७५० रुपयाला मिळणारी बॉक्सिंग कीट आता एक हजार रुपयापर्यंत पोहचली आहे.

Sport equipment
सिडकोच्या उड्डाणपुलात पर्यावरणमंत्र्यांचा दणका

साहित्याचे नाव आधीचे भाव आताचे भाव

क्रिकेट बूट ७५० रुपये ९९५ रुपये

खन्ना कंपनीचा सूपर बॉल ८० रुपये १२० रुपये

क्रिकेट बॅट १,२०० रुपये १,६०० रुपये

क्रिकेट पॅड १,२०० रुपये १,५५० रुपये

क्रिकेट ड्रेस ९०० रुपये १,२०० रुपये

बॉक्सिंग ग्लोज (सरावाचे) ४५० रुपये ६२५ रुपये

बॉक्सिंग ग्लोज (मॅचमधील) १,९०० रुपये २,६५० रुपये

क्रीडा साहित्यात होणारी वाढ ही ग्राहकांना आर्थिक फटका देणारी आहे. परंतु, थोक साहित्यात वाढ झाल्यामुळे व्यावसायिकांनाही साहित्यात वाढ करावी लागली.

-जसवंतसिंग मल्ली, एम.पी.स्पोर्टस्, अकोला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com