बालकांना दिला जातो मुदतबाह्य पोषण आहार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Expired nutrition given to children Anganwadi Murtijapur

बालकांना दिला जातो मुदतबाह्य पोषण आहार

मूर्तिजापूर : एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत आपल्या मुलाला अंगणवाडीतून मुदतबाह्य आहार मिळाला असून, त्यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी स्थानिक रहिवाशी सतीश गवई या पालकाने ता. २४ मार्च रोजी महिला व बालविकास आयुक्तालय, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली.

येथील एकात्मिक बालविकास योजना कार्यालयाच्या माध्यमातून अंगणवाडीतील बालकांना पोषण आहाराचे वाटप करण्यात येते. येथील कारंजा रस्त्यावरील अंगणवाडी क्रमांक सहामधून सतीश गवई यांच्या मुलास मुदत बाह्य पोषण आहाराचे वितरण करण्यात आले. सदर सीलबंद पाकीटावर पॅकेजिंगची ता. ९ सप्टेंबर २०२१ आहे. पॅक केल्याच्या तारखेपासून चार महिन्याच्या आत हा आहार वापरण्याची सूचना ठळक व स्पष्टपणे पाकीटावर लिहिलेली आहे. असे असूनही या अंगणवाडीतून गुरुवारी (ता.२४) मुदत संपलेल्या पोषण आहाराचे वितरण करण्यात आले.

त्यामुळे संबंधित विभाग बालकांच्या आरोग्याशी कसा खेळत असल्याचे दिसून येत आहे. हा मुदत बाह्य पोषण आहार अंगणवाडीत पाठवणारे अधिकारी-कर्मचारी व अंगणवाडीत त्याचे वितरण करणारे अंगणवाडी सेविका व इतर किती जबाबदार व्यक्ती आहेत हे यावरून दिसून येते. त्यामुळे संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य कारवाई करण्याची मागणी सतीश गवर्ई यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. निवेदनाची प्रति उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, येथील एकात्मिक बालविकास कार्यालयास देण्यात आल्या आहेत. सदर मुदतबाह्य आहारचे अनेक बालकांनी सेवन केल्याची शक्यता असून, त्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामास कोण जबाबदर? असा प्रश्न त्यानिमित्याने उपस्थित होत आहे.

Web Title: Expired Nutrition Given To Children Anganwadi Murtijapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top