
अकोला : केंद्रीय पातळीवर अकोल्याच्या विमानतळाच्या विस्ताराबाबत आवश्यक कार्यवाही सुरु आहे. खासदार अनुप धोत्रे हे विमानतळाच्या विस्तारासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. केंद्र सरकार व संबंधित विभागांशीही ते संपर्कात आहेत. त्यामुळे हा विषय आम्ही प्राधान्याने हाताळत आहोत. अकोलेकरांचे विमानतळाचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल, असे आश्र्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. जिल्ह्यातील अडीच हजार कोटींच्या निधीतून साकार होणाऱ्या विकासकामांच्या लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमावेळी नियोजन भवनात पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी हे वक्तव्य केले.