फडणवीस ज्योतिषी, मी नाही : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

मनोज भिवगडे
Monday, 6 July 2020

देवेंद्र फडणीवस हे ज्याेतिषी आहेत, मी नाही. त्यामुळे राज्यातील सरकार पडणार की, पडणार नाही, हे तेच सांगू शकतील, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी साेमवारी (ता. 6) अकाेला येथे पत्रकार परिषदेत सांगितले. 

अकाेला :  देवेंद्र फडणीवस हे ज्याेतिषी आहेत, मी नाही. त्यामुळे राज्यातील सरकार पडणार की, पडणार नाही, हे तेच सांगू शकतील, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी साेमवारी (ता. 6) अकाेला येथे पत्रकार परिषदेत सांगितले. 

 

ओबीसी विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाबाबत माहिती देण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदेचे आयाेजन केले हाेते. केंद्र व राज्यातील सत्ताधारी हे आरक्षण विराेधी असून, त्यांच्या दूर्लक्षामुळे ओबीसीच्या अकरा हजार विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचा आराेप अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. राज्यातील सरकार पडणार की नाही पडणार हे भाजपाचे माजी मुख्यमंत्री व pवराेधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस सांगू शकतील, ते ज्याेतिषी आहेत, मी नाही असे आंबेडकर म्हणाले. या विषयी त्यांनी प्रत्येक आमदाराला पुन्हा निवडणूक नकाे आहे, असे म्हणत त्यांनी हे सरकार पडणार नाही असे सुताेवाच अप्रत्यक्षपणे केले. pवद्यमान राज्यपाल हे कायद्यानुसार काम करत असून, त्यांच्या या कार्यशैलीमुळेच त्यांनी 12 आमदारांच्या pनयुक्तीचा मुद्दा तुर्तास थांबविला आहे. राज्यभवन हे घटनात्मक केंद्र आहे. राज्यपाल हे कायद्याला धरून काम करत असल्याने राजकीय पक्षांना पेच निर्माण झाल्याचे अ‍ॅड.आंबेडकर म्हणाले. यावेळी पत्रकार परिषदेला प्रा.डाॅ.धैर्यवर्धन पुंडकर, प्रदीप वानखडे, डाॅ. प्रसन्नजीत गवई यांची उपस्थिती हाेती.

 

ओबीसीचे अकरा हजार विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशापासून वंचित
केंद्र सरकारने ओबीसीसाठी राखीव असलेल्या वैद्यकीय जागेवर या समाजातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला नाही. 2017 पासून ते आजपर्यंत या धाेरणामुळे अकरा हजार ओबीसीचे विद्यार्थथी वैद्यकीय प्रवेशापासून आरक्षणा अभावी वंचित राहिले आहेत. माेदी सरकारच्या चुकीच्या आरक्षण धाेरणामुळे फटका ओबीसींना बसल्याची टीका वंचितचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. देश पातळीवरील ऑल इंडिया फेडरेशन ऑफ अदर बॅकवर्ड क्लासेसनी ही आकडेवारी जाहीर  केली असून, नीट या प्रवेशामध्ये ओबीसीला कायद्यानुसार आवश्यक असलेले 27 टक्के आरक्षण न दिल्यामुळे आज ओबीसीचे 11 हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. वस्तुतः भारतीय राज्यघटनेच्या 93 व्या दुरूस्तीनुसार केंद्र शासनाने ओबीसींना 27 टक्के आरक्षण देणे आवश्यक आहे. परंतु ऑल इंडिया हा नॅशनल इंटलजीबिलीटी एन्ट्रन्स टेस्ट (एन.ई.ई.टी.) मार्फत भरल्या जात असून, केंद्र शासनाने सदर प्रवेश प्रक्रियेमध्ये ओबीसीला आवश्यक असणारे आरक्षण सन 2017 पासून कमी केले आहे व त्याचाच फटका ओबीसींना बसला आहे. परंतु केंद्र सरकारने नीटला हाताशी धरून कट ऑफ मध्ये बदल घडवून ओबीसीचे आरक्षण संपण्याचा डाव रचला आहे. त्यामुळे शैक्षpणक सत्र 2017-18, 2019-20 या शैक्षिणक क्षेत्रामध्ये ओबीसीला आरक्षणाचा फटका बसला आहे. ओबीसींना हक्का असणारे आरक्षण मिळेपर्यंत वंचित बहूजन आघाडी आंदोलन करेल,  असे प्रतिपादन अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले आहे.

चीन सैनिक किती आले त्याती माहिती द्या
चीन सैनिक २ किलोमीटर मागे गले पणे, ते किती कि.मी. आत आले होते, याची माहिती सरकाराने द्यावी. कोरोना सकंट काळातील भ्रष्टाचार अद्याप बाहेर निघाला नाही. तो पुढे बाहेर निघेल, अशी अपेक्षा अॅड. आबंडेडकर यांनी व्यक्त केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fadnavis astrologer, I am not: Adv. Prakash Ambedkar