Akola News: बोगस डॉक्टरकडून उपचार; गरोदर महिलेचा मृत्यू, अनधिकृत वैद्यकीय प्रॅक्टिसचा मुद्दा ऐरणीवर
Fake Doctor: पातूरच्या रामनगर भागात गरोदर महिलेच्या मृत्यूनंतर बोगस डॉक्टर नंदू गावंडे यांचा भंडाफोड झाला. वैद्यकीय पदवी नसतानाही उपचार करत असल्याने पातूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पातूर : पातूर मधील रामनगर परिसरात गरोदर महिलेच्या मृत्यूनंतर बोगस डॉक्टरचा भंडाफोड झाला आहे. कोणतीही वैद्यकीय पदवी वा नोंदणी नसतानाही उपचार करणारे नंदू गावंडे यांच्या दवाखान्यावर जिल्हा आरोग्य विभागाच्या पथकाने २३ जुलै रोजी छापा टाकला होता.