FDA Crime : ५० लाखांहून अधिक किमतीचा बनावट गुटखा जप्त! एमआयडीसीतील कारखान्यावर एफडीएची कारवाई; तीन जण ताब्यात, मुख्य सूत्रधार फरार

बनावट गुटखा निर्मितीच्या मोठ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई करत तब्बल ५० लाखांपेक्षा अधिक किमतीचा बनावट गुटखा व कच्चा माल केला जप्त.
Gutkha Seized

Gutkha Seized

sakal

Updated on

अकोला - एमआयडीसीच्या ग्रोथ सेंटर क्रमांक ४ मध्ये सुरू असलेल्या बनावट गुटखा निर्मितीच्या मोठ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाने गुरुवारी पहाटे धडक कारवाई करत तब्बल ५० लाखांपेक्षा अधिक किमतीचा बनावट गुटखा व कच्चा माल जप्त केला. या कारवाईदरम्यान छत्तीसगडमधील तीन जणांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले असून या रॅकेटचा मुख्य सूत्रधार गौरव शर्मा हा फरार झाला आहे. या कारवाईमुळे अकोल्यातील गुटखा माफियांचे धाबे दणाणले असून संपूर्ण रॅकेट उघडकीस आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com