
अकोला : ‘नोकरी मिळेल’ या स्वप्नांवर स्वार होऊन लाखो रुपये गमावणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांच्या भावनांशी खेळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (‘डब्ल्यूसीएल’) मध्ये कायमस्वरूपी नोकरी लावण्याच्या आमिषाने कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.