
शहिदाच्या कुटुंबियांना गेट बंद करून कोंडले!
अकोला : शहीद आनंद गवई यांचे स्मारकासाठी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या जागेवर शहीद आनंद गवई यांचे पुतळ्या जवळ सत्याग्रह करणारे तिन्ही शहीदांच्या कुटुंबातील सदस्य यांना गेट बंद करून कोंडल्याचा संतापजनक प्रकार गुरुवारी अकोल्यात घडला. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेवून या कुटुंबियांची सुटका केली.
शहीद आनंद गवई यांच्या स्मारकासाठी त्यांचे आई-वडील उपोषणाला बसले होते. त्यांच्यासोबत शहीद सुमेध गवईचे (लोणाग्रा, २०१७) आई-वडील मायावती व वामन गवई, शहीद आनंद गवईचे (बायपास अकोला) आई-वडील गौकणाबाई व शत्रुघ्न गवई आणि शहीद संजू खंडारे (माना) २०१७ यांचे आई-वडील सुलोचना व सुरेश खंडारे हे स्मारकासाठी सत्याग्रह करीत होते. त्यावेळी वनविभागाच्या अधिकऱ्यांनी पार्कच्या गेटला कुलूप लावून शहीद आनंद गवई, शहिद संजू खंडारे आणि शहीद सुमेध गवई यांचे कुटुंबातील सदस्यांना कोंडून घेतले.

ही माहिती वंचित बहुजन युव आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देडवे, बुलडाणा प्रभारी प्रदीप वानखडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन शिराळे व इतर पदाधिकाऱ्यांना मिळाली. त्याच वेळी त्यांनी लक्झरी बस स्थानका मागे असलेल्या स्मारकाच्या जागेवर धाव घेत गेटचे कुलुप तोडून तिन्ही शहीद कुटुंबांची सुटका केली. सोबतच तोडलेला वीज पुरवठा पूर्ववत केला. लक्झरी बस स्थानाकाच्या बाजूला असलेल्या बागेच्या जागेवर शहीद आनंद गवई यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले.
वन विभाग आणि जिल्हा प्रशासनाने शहिदांच्या कुटुंबाचा अवमान केल्यास वंचितच्या स्टाईलने उत्तर देण्याचा इशारा राजेंद्र पातोडे यांनी दिला. यावेळी आतिष सिरसाट, संजय नाईक, निक्की डोंगरे, गजानन दांडगे, उपसभापती आनंद डोंगरे, उमेश निखाडे, मुरलीधर पातोडे, समाधान तायडे, मनोज गोपणारायन, अनिल वानखडे, संदिप इंगळे, सूरज सिरसाट प्रामुख्याने उपस्थित होते. या संदर्भात वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
Web Title: Family Army Martyr Locked Gate Satyagraha Held Monument Vanchit Bahujan Aaghadi Bearers Rushed Help
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..